ॐकाराचा प्रभाव!

    दिनांक :05-Oct-2019
मनावर नियंत्रण करून शब्दाचे उच्चारण करण्याच्या क्रियेला आपण मंत्र म्हणतो. मंत्राचा सर्वात जास्त प्रभाव आपल्या तन आणि मनावर पडतो. मंत्र जप ही एक मानसिक क्रिया आहे. असे म्हटले जाते की, जसे असेल मन तसे असेल तन!
 
 
 
 
मन स्वस्थ ठेवण्यासाठी मंत्राचा जाप करणे फार आवश्यक आहे.
 
ॐ हा तीन अक्षरांनी बनलेला आहे. अ, उ आणि म ने निर्मित हा शब्द सर्वशक्तिमान आहे. जीवन जगण्याची शक्ती आणि संसार आव्हानांचा सामना करण्याचे अगम्य साहस देणारा, ॐ उच्चारण करण्याने विभिन्न प्रकारच्या समस्या व व्याधींचा नाश होतो. सृष्टीच्या आरंभी एक ध्वनी झाला तो म्हणजे ॐ आणि पूर्ण ब्रह्माण्डात हा ध्वनी पसरला आणि याच ध्वनीद्वारे भगवान शिव, विष्णू आणि ब्रह्मा प्रकट झाले. म्हणून ॐ हा सर्व मंत्राचा बीजमंत्र आणि ध्वनी व शब्दाचा निर्माता म्हटले आहे. असे म्हटले जाते की, ॐच्या नियमित उच्चाराने आपल्या शरीरातील आत्मा जागृत होतो आणि सर्व रोग व तणावापासून मुक्त होतो. म्हणून आपले साधू-संत, सद्गुरू ॐ म्हणण्यास सांगत असतात. तसेच अनेक वास्तुतज्ज्ञ सांगतात की, घरात ॐ चा उच्चार करत राहिल्यास घरतील वास्तुदोष नष्ट होतो. ॐ मंत्राला ब्रह्मांडाचे स्वरूप मानले आहे. असे मानले जाते की, ॐ मध्ये त्रिदेवाचा वास आहे. म्हणून मंत्राच्या अगोदर ॐ चे उच्चारण केले जाते. जसे- ॐ नमो भगवते वासुदेव िंकवा ॐ नमः शिवाय।
आध्यात्मिक दृष्टीने असे मानले जाते की, ॐ चा जाप करत राहिले तर मन शांत आणि शुद्ध होते आणि मानसिक शांती प्राप्त होते. ॐ मंत्राच्या जपाने मनुष्य ईश्वराच्या फार जवळ जातो.
 
ॐ हेच ईश्वराचे खरे नाव आहे.
योगदर्शनात हे स्पष्ट आहे की हा ॐ शब्द तीन अक्षरांनी मिळून बनला आहे.
- अ, उ, म. प्रत्येक अक्षर ईश्वराच्या वेगवेगळ्या नावांना आपल्यात सामावून घेतले आहे. जसे अ ने व्यापक, सर्वदेशीय, आणि उपासना करण्यायोग्य आहे. उ ने बुद्धिमान, सूक्ष्म, सर्व चांगल्या तत्त्वाचे मूल आणि नियम करणारा आहे.
म ने अनंत, अमर, ज्ञानवान, आणि पालन करणारा, हे फार सूक्ष्म उदाहरण दिले आहे.तसे बघितले तर ॐ प्रत्येक अक्षराने समजू शकतो वास्तवात अनंत ईश्वराची अगणित नावे केवळ या ॐ शब्दातच येतात.
 
1) बराच काळ ॐ चे उच्चारण केल्यास पूर्ण शरीर तणावरहित होते.
2) आपणास भीती वाटत असेल, घबराट होत असेल, अंग थरथरत असेल तेव्हा ॐ चे उच्चारण करीत राहिल्यास पटकन फरक पडतो.
3) नित्य ॐ च्या उच्चाराने शरीरातील विषारी तत्त्वे नष्ट होतात, शरीर आरोग्यदायी बनते, स्वस्थ बनते.
4) यामुळे हृदय आणि रक्तप्रवाह संतुलित होतो. पाचनशक्ती सुधारते.
5) यामुळे शरीरात स्फूर्तीचा संचार होतो.
6) थकव्यापासून वाचण्यासाठी हा फार चांगला उपाय आहे.
7) झोप येत नसेल, अनिद्रेचा त्रास असेल तर ॐच्या उच्चाराने जाते. रात्री झोपताना झोप येई पर्यत ॐ चा उच्चार करावा आपोआप न कळत झोप लागून जाते.
8) काही विशेष प्राणायाम करताना ॐ चा उच्चार केल्यास फुफ्फुसामध्ये बळ येते.
असे अगणित उपाय आहेत.
 
ॐ उच्चारण हे आत्म्याचे संगीत आहे.
ॐ हे चिन्ह अद्भुत आहे.
हे संपूर्ण ब्रह्मांडाचे प्रतीक आहे. ब्रह्मचा अर्थ- विस्तार, पसारा, पारणे, ओंकार ध्वनीचे 100 पेक्षा अधिक दिले आहेत. अनादी आणि अनंत व निर्वाणाच्या अवस्थेचे प्रतीक आहे. हा प्रणव मंत्र आहे. हा मंत्राचा प्रारंभ आहे अंत नाही. हा ब्रह्मांडाचा अनाहत ध्वनी आहे. अनाहत अर्थात दोन गोष्टी एकमेकांना टकरणे. दोन गोष्टी एकमेकांना टकरणे त्याचा जो ध्वनी होतो, तो हा अनावर ध्वनी नाही.पण, संपूर्ण ब्रह्मांडात हा ध्वनी चालू आहे.
 
तपस्वी आणि ध्यान करणारे जेव्हा ध्यानाच्या खोल अवस्थेत जातात तेव्हा त्यांना हा ॐ चा ध्वनी ऐकू येतो.हा ध्वनी या जगात सर्वत्र चालू आहे, फक्त आपली करण्याची क्षमता पाहिजे. हा ध्वनी ध्यानात ऐकू येऊ लागता मन आणि आत्मा शांती अनुभवू लागतो.
 
साधारण मनुष्य हा ध्वनी ऐकू शकत नाही, पण जो कोणी नेहमी ॐ चे उच्चारण करत असेल त्याच्या आसपास सकारात्मक ऊर्जेचा विकास होऊ लागतो. हा ध्वनी ऐकण्यासाठी पूर्णत: मौन आणि ध्यानात असणे महत्त्वाचे आहे. जो हा ध्वनी ऐकू लागतो त्याचे परमेश्वराशी नाते बनू लागते.
 
होणारे लाभ
त्यामुळे शरीर आणि मन एकाग्र होण्यास मदत होते. हदय व रक्तसंचार व्यवस्थित होतो. मानसिक आजार बरे होतात. काम करण्याची शक्ती वाढते. प्रिय व अप्रिय शब्दाचे ध्वनी काढल्याने श्रोता आणि वक्ता दोघांनाही हर्ष, विषाद, क्रोध, घृणा, भय व कामेच्छेचा आवेग येऊ शकतो. अप्रिय शब्दातून निघणारा ध्वनी आपल्या मस्तिष्कात काम, क्रोध, मोह, भय लोभाची भावना उत्पन्न करतो त्यामुळे हदय व रक्तसंचारावर परिणाम होतो. ह्याचे धडकणे वाढते त्यामुळे रक्तात ‘टॉक्सिक’ पदार्थ निर्माण होतात. म्हणून चांगले, प्रिय आणि मंगलमय शब्दाचा उच्चार करावा त्यामुळे मस्तिष्क, हृदय आणि रक्तावर अमृतसारखा आल्हादकारी रसायनाचा वर्षाव होतो, आनंदी वाटते.
 
कमीत कमी रोज 108 वेळा ॐ चा उच्चारण केल्याने शरीरातील तणाव नष्ट होतो, रोज नित्य नियमाने जपल्यास शरीरात एक नवी ऊर्जा संचार करू लागते चेहर्‍यावर तेज येऊ लागते. हातून चांगली कामे होऊ लागतात. आपले शत्रू मित्र बनू लागतात. मनातील निराशा निघून जाते. वाईट विचार मनात येत नाही. ज्या मुलांचे अभ्यासात मन लागत नाही, वाचलेले लक्षात राहात नाही, स्मरणशक्ती कमजोर आहे त्यानी ॐचे उच्चारण नियमित करावे त्यामुळे स्मरणशक्ती चांगली होऊन अभ्यासात मन लागते.
अविनाश शास्त्री