चिखलीत मुसळधार पाऊस

    दिनांक :05-Oct-2019
गेल्या आठवड्यात राज्यात विविध भागांत अतिवृष्टीचा तडाखा दिल्यानंतर थोडी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा आगमनाची चाहुल दिली आहे. दरम्यान, आज चिखली शहर व परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग केली. अचानक आलेल्या पावसामुळे चिखलीकरांची चांगलीच तारांबळ उडाली. मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते.