शिवलिंगाला अर्धप्रदक्षिणा का घालावी?

    दिनांक :05-Oct-2019
महादेवाचं पूजन करताना काही नियमांचं पालन करावं लागतं. शंकाराच्या पूजनात वर्ज्य असणारी एक बाब म्हणजे पूर्णप्रदक्षिणा. शंकराला, त्यातही शंकराच्या पिंडीला कधीही पूर्ण प्रदक्षिणा घातली जात नाही. अर्ध्यातूनच मागे फिरावं लागतं. शिवलिंगाची अर्धपरिक्रमा करण्यामागचं नेमकं कारण जाणून घेणं गरजेचं आहे. शिवपुराण आणि शास्त्रांमध्येही याबाबत नमूद करण्यात आलं आहे. शिव म्हणजे आदी आणि अंत असल्याने त्याला अर्धपरिक्रमा घालायला हवी, असं शास्त्र सांगतं.
 

 
 
 
* दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शिवलिंगाची रचना. शंकराच्या पिंडीतून बाहेर पडणारी ऊर्जा अमर्याद असते. शिवलिंगाचा निर्मिली हा भाग या ऊर्जेचं प्रतिनिधित्त्व करतो. पिंडीला अर्पण केलेलं दूध आणि पाणी शिवलिंगाच्या ज्या भागातून बाहेर पडतं तो भाग म्हणजे निर्मिली.
 
* शिवाच्या शक्तीचं स्वरूप अत्यंत तीव्र असल्याने त्या मध्ये येण्याची िंहमत कोणीही करू शकत नाही. निर्मिलीमध्ये ही शक्ती वास करत असल्याने शिवलिंगाचा हा भाग अत्यंत पवित्र मानला जातो. निर्मिली ओलांडून जाऊ नये, असं शास्त्रांमध्ये नमूद करण्यात आलं आहे. गंधर्व नावाच्या शिवभक्त राजाने पूजनानंतर पूर्ण प्रदक्षिणा घालून निर्मिली ओलांडली. यानंतर या राजाची बुद्धी, शक्ती, संपत्ती नष्ट झाली.
 
* निर्मिलीला स्पर्श केल्याने तसंच ती ओलांडल्याने शिवलिंगाचा म्हणजे साक्षात भगवान शंकराचा अपमान होतो, असं मानलं जातं. शिवलिंगाला अर्धप्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे.
 
* जुन्या काळात शिवलिंगाची रचना विशिष्ट प्रकारे केली जात असे. निर्मिली जमिनीखाली राहिल या पद्धतीने शिवलिंग निर्माण केलं जात असे. पण आधुनिक युगात निर्मिली जमिनीच्या वरच्या भागातच असते. पूर्ण प्रदक्षिणा घातली तर ती ओलांडली जाते. त्यामुळे शिवलिंगाच्या पूजनानंतर अर्धप्रदक्षिणा घालणं योग्य ठरतं.