आगरगावचा युवक वाघाच्या हल्ल्यात ठार

    दिनांक :05-Oct-2019
 
 
आगरगावातील नागरीक संतप्त
 
कारंजा घाडगे, 
तालुक्यातील आगरगाव येथील भुमेश रमेशराव गाखरे या २० वर्षीय युवकाला पट्टेदार वाघाने ठार केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. नित्यनेमाप्रमाणे भुमेश हा शुक्रवारी दुपारी ३ वाजताचे दरम्यान गावाबाहेरील त्याच्या शेताकडील शिवारात स्वता:ची गुरेढोरे चारण्यासाठी घेऊन गेला होता.सायंकाळी गुरांचा कळप घरी परत आला परंतु भुमेश न परतल्याने गावकऱ्यांनी शोधाशोध केली.  असता आगरगावाला लागुनच असलेल्या १२९ संरक्षित वनक्षेत्र परीसरात भुमेशचा मृतदेह आढळून आला. त्याठिकाणी वाघाच्या पावलाचे ठसे आढळून आले व पळसाच्या झाडाचा वरचा भागही ओरबडलेला आढळून आला.वाघाने भुमेशवर हल्ला करताच त्याने झाडावर चढण्याचासुध्दा काहीअंशी प्रयत्न केल्याचे घटनास्थळावरील परीस्थितीवरून दिसल्याचे वनविभागा कडून सांगण्यात आले. तातडीची आर्थिक मदत म्हणून पाच लाखाचा धनादेश मृतक भुमेशच्या कुटूंबियाना यावेळी देण्यात आला. मृतकाच्या पश्चात आईवडील एक मोठी बहीण व लहान भाऊ आहे.या दुखद घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.