फाउंडेशन ऑफ लर्निंग

    दिनांक :06-Oct-2019
डॉ. शुभांगी रथकंठीवार
9764996797 
 
आजच्या तरुण पिढीला संपूर्ण राष्ट्राच्या प्रगतीसाठी शाश्वत विकासाची पावलं टाकण्यासाठी आवाहन, आग्रह आणि तदनंतर उद्युक्त करताना असं जाणवलं की, राष्ट्रउभारणीच्या स्वप्नांचा आवाका त्यांच्या दृष्टिपथाच्या आवाक्यात आणणं त्यांना काहीसं कठीण वाटत आहे आणि असं बहुतांशी का व्हावं? या पिढीस सक्षम बनवण्यासाठी आपण कुठे कमी पडत आहोत? 

 
 
रिसर्च अँड इनोव्हेशन्स (आर अँड आय)च्या आधारे इस्रायल, अमेरिका, चायना, जपान आज आर्थिकदृष्ट्या केवळ स्वयंसिद्धच नव्हे, तर जगावर तंत्रज्ञान, विज्ञान आदी क्षेत्रात अधिराज्य करण्याच्या स्थितीत आले. या वर्षीच्या इकॉनॉमिक सर्वेनुसार या सर्वांमध्ये भारत फार मागे आहे, कारण इथे एक लाख पॉप्युलेशनमागे केवळ 15 रिसर्चर्स काहीसं उल्लेखनीय कार्य करत आहेत आणि ज्यांचं कार्य भारताच्या इकॉनॉमिक ग्रोथच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे, अशांचं प्रमाण आणखी कमी आहे. वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन (विपो)ने दिलेल्या आकडीवारीनुसार चायनाने 13,38,503 पेटंट अॅप्लिकेशन्स फाईल केले आहेत. भारतात फाईल झालेल्या 45000 पेटंट अॅप्लिकेशन्समधील 70 टक्के अॅप्लिकेशन्स नॉनरेसिडंट इंडियन्सचे आहेत. रिसर्च पब्लिकेशन्सचे प्रमाणदेखील कमी आहे. याचाच अर्थ, आपल्याकडील ‘इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटस्‌’चे प्रमाण अत्यल्प आहे, जे वाढण्याची फार जास्त आवश्यकता आहे. इंडियन एज्युकेशन सिस्टीममध्ये आज महत्त्वपूर्ण रिफॉर्म्स आणि ट्रान्सफॉर्मेशन्स आणून ‘आर अँड आय’ अॅक्टिव्हिटीज फार प्रमाणावर वाढवण्याची आवश्यकता आहे.
 
 
आजच्या तरुणांचा मनाचा कल रिसर्चकडे वळलेला फारसा दिसत नाही, कारण लवकरात लवकर डिग्री मिळवून आयटी सेक्टरमध्ये जॉब मिळवणे, इतकी मर्यादित आत्मकेंद्रित स्वप्नं बघणारी ही पिढी ‘रिसर्च अँड इनोव्हेशन्स’ आणि पर्यायाने त्याद्वारे राष्ट्राच्या प्रगतीकडे वळत नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. त्यांची पावलं बालवयातच विकासाच्या वाटचालीकडे वळली असती, तर त्यांची स्वप्नं अधिक अर्थपूर्ण राहिली असती आणि महत्त्वाकांक्षी मार्गक्रमणाद्वारे उद्दिष्टपूर्तीची यशोमयी शिखरं सहज गाठली गेली असती.
 
 
या लेखमालेद्वारे जुळला गेलेला शिक्षकवर्ग ‘प्रायमरी एज्युकेशन’च्या संदर्भात थोडा सविस्तर संवाद साधू इच्छित असल्याने हा लेखप्रपंच! आमच्या शाळेची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी आम्हाला रोडमॅप बनवून द्याल का?, आमचे विद्यार्थी वयाने फार लहान आहेत. मात्र, आमची अशी इच्छा आहे की, नॅशनल बोर्ड ऑफ अक्रेडिटेशनने जसे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे ग्रॅज्युएट अॅट्रिब्युटस्‌ बनवले तसे प्रायमरी, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरच्या विद्यार्थ्यांसाठी बनवता यावे. तुम्ही ते बनवून द्याल का?, शिक्षकांनी इंडिव्हिज्युअल लेव्हलवर ‘ट्रान्सफॉर्मेशन मॉडेल फॉर टीिंचग’ कसं बनवायचं, हे सांगाल का?... असं वेगवेगळ्या शाळांमधील शिक्षकांनी विचारलं, तेव्हा फाउंडेशन लेव्हलच्या एज्युकेशनवर विचार करायला सुरुवात केली.
 
 
अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना ‘चाईल्ड एज्युकेशन सिस्टीम’वर भाष्य करण्याचा तितकासा अधिकार नाही, मात्र ‘एक्स्पेरिमेंट बेस्ड लर्निंग’च्या पायाभरणीद्वारे शालेय विद्यार्थ्यांचे गणितीय आणि वैज्ञानिक तत्त्वांवर आधारित टेक्निकल माइंडसेटची मजबूत इमारत उभारण्याचं शाश्वत विकासी स्वप्न साकार करण्याच्या दृष्टिकोनातून आणि विद्यार्थ्यांमध्ये ‘क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन्स’वर आधारित सातत्याने प्रायोगिक जगात निर्माण करणार्‍या ‘ज्ञान फाउंडेशन’च्या माध्यमातून काही कार्य हाती घेतल्यामुळे शालेय शिक्षणप्रणालीत काही महत्त्वपूर्ण बदल यावेत, या आग्रही विचारासह प्रस्तुत लेखाद्वारे समविचारी शिक्षकांसोबत संवाद साधण्याचा हा अनुभवनिष्ठ प्रयत्न!
 
 
नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची सुरुवातच अर्ली चाइल्डहूड केअर अँड एज्युकेशन (इसीसीई) : द फाउंडेशन ऑफ लर्निंग यापासून झाली असल्याने त्या अनुषंगाने काही मुद्दे चर्चिले जाऊ शकतात.
प्रत्येक मुलाची लर्निंग प्रोसेस त्याच्या जन्मानंतर लगेच सुरू होत असली, तरी न्यूरोसायन्समधील रिसर्च डेटा अॅनालिसिसनुसार वयाच्या 3 ते 6 या वयात अंदाजे 85 टक्के ‘क्युम्युलेटिव्ह ब्रेन डेव्हलपमेंट’ होत असते. या वयात अत्यंत काळजीपूर्वक त्यांच्या मेंदूची जडणघडण झाली तर, म्हणजे अर्थातच अंतर्मनाचे संस्करण झाले तर आयुष्यभर त्यांची प्रगतिशील वाटचाल शाश्वतार्थाने संभवते. या वयात त्यांना आकलन होईल असे अर्थपूर्ण, उत्तम दर्जाचे शिक्षण आणि संस्कार प्राप्त झाले, तर कधीही न संपणारी हीच पुंजी त्यांना वैयक्तिकच नव्हे, तर देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वापरता येईल.
 
 
एका सर्व्हे प्रोसेसमध्ये सहा वर्षांखालील आणि विविध बॅकग्राउंडच्या मुलांचं ब्रेन स्कॅन करून काही महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढण्यात आले. या अॅनालिसिसमध्ये काही धक्कादायक बाबींची नोंददेखील करण्यात आली. जी मुलं वंचित आहेत, पीडित आहेत, ते ज्या वातावरणात वाढत आहे ते कदापि, मनावर त्यांच्या मेंदूच्या काही महत्त्वपूर्ण भागाची वाढ न झाल्यामुळे त्यांच्या कॉग्निटिव्ह आणि इमोशनल प्रोसेिंसगवर फार गंभीर भावनिक परिणाम झाला आहे. ज्या मुलांना अत्यंत काळजीपूर्वक, प्रेमळ वागणूक देऊन त्यांचे सुयोग्य पद्धतीने संस्करण करण्यात आले, त्यांची मानसिकता जपून, त्यांची हेल्थ आणि न्यूट्रिशन यासोबतच सायको-सोशल जाणिवा, बरोबर-चूक याचे आकलन आदी बाबतीत काळजी घेऊन, त्यांना ज्ञान प्रदान करण्यात आले. त्यांच्या मेंदूतील कॉग्निटिव्ह आणि इमोशनल स्टिम्युलेशन आणि लर्निंग कर्व्हज दर्शवतात की, आयुष्यभरासाठी त्यांचे इंटेलेक्च्युअल डिपॉझिटस्‌ इन्व्हेस्टमेंट बनू शकतात. या प्रकारच्या इन्व्हेस्टमेन्टचे रिटर्न्सदेखील अत्यंत फायदेशीर आहेत. कारण वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत त्यांची योग्य जडणघडण झाल्यामुळे ही मुलं मोठी झाल्यानंतरदेखील नैतिक मूल्य जपणारी, प्रामाणिक, विचारशील, सर्जनशील, सहानुभूतिशील, भावनाप्रधान आणि क्रिएटिव्ह माईंडेड राहतात. शाश्वत विकासाचा उगम इथेच असणं साहजिक आहे आणि म्हणूनच प्रत्येक पालकाने आणि नर्सरी, प्रायमरीच्या शिक्षकांनी इसीसीईचा विचारपूर्वक अवलंब केला, तर राष्ट्राच्या नैतिक प्रगतीत त्याचादेखील िंसहाचा वाटा असेल.
 
 
प्रत्येक घरी निकोप, सुसंवादी असं लर्निंग एन्व्हायरन्मेंट उपलब्ध करून देणं अशक्य आहे का? आपसातील वाद बाजूला ठेवून मुलांना कलहित जीवनाचा चेहरा दिसू न दिल्यास त्यांना घरातील वास्तव्य आनंददायी वाटेल.
 
 
अंगणवाडी तसेच प्रायमरी शाळांमधून अगदी सोप्या पद्धतीने आणि मुलांना अगदी खेळीमेळीचे वातावरण देऊन काही सुपरव्हाइझ्‌ड (पर्यवेक्षी) प्ले-बेस्ड अॅक्टिव्हिटीज अरेंज करता येऊ शकतात. मुलांची वैयक्तिक प्रगती करताना काही अॅक्टिव्हिटीतून ग्रुप डायनॅमिक्सदेखील डेव्हलप करता येऊ शकते आणि सहज रीत्या त्यांच्यात सहकार्य क्षमता, कार्यसंघटन, सामाजिक घटकांशी संवाद साधणे, इक्विटी, सर्वसमावेशकता, संप्रेषण, सांस्कृतिक उपक्रमात भाग घेण्याची आवड, कुतूहल, सर्जनशीलता, आदर आणि इतर क्षमता प्रवाही पद्धतीने डेव्हलप होऊ शकतात. अक्षरे, भाषा, संख्या, मोजणी, रंग, आकार, रेखाचित्र/चित्रकला, इनडोअर आणि मैदानी खेळ, कोडी आणि तार्किक विचार, व्हिज्युअल आर्ट, हस्तकला, नाटक, संगीत या माध्यमातून आजवर मुलांना आपण घडवत असलो, तरी त्यांच्या ब्रेन अॅक्टिव्हिटीचं योग्य पद्धतीने मूल्यमापन व्हायला हवं.
 
 
‘आंबेडकर युनिव्हर्सिटी, दिल्ली’ने केलेल्या ‘अर्ली चाइल्डहूड एज्युकेशन इम्पॅक्ट’ सर्वेक्षणानुसार, बहुतांशी प्रीप्रायमरी स्कूल्समध्ये शिकलेली मुलं प्रायमरी एज्युकेशनमधील अभ्यासक्रम समजण्याच्या दृष्टिकोनातून तयार झालेलीच नसतात. कारणं अनेक आहेत. त्यानंतर ते पुढील वर्गात प्रमोट केल्या तर जातात, मात्र त्यांचे सायन्स आणि मॅथेमॅटिक्सचे कन्सेप्टस्‌ योग्य प्रमाणावर क्लीयर होत नसल्याने माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावरदेखील ते पुरेसे यशस्वी होत नाहीत आणि आजच्या युगाची आवाहनं त्यांना झेपत नाही.
 
 
देशाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ‘अर्ली चाईल्ड एज्युकेशनवर’ आपलं सर्वांचं लक्ष केंद्रित होणं अत्यावश्यक आहे. 2025 पर्यंतचा कालावधी जमेस धरून, सर्व बालकांना सुयोग्य रीतीने घडवण्याच्या हेतूने एनसीईआरटीने काही महत्त्वपूर्ण पॉलिसी इनिशिएटिव्हज घेतले आहेत. करिक्युलर आणि पेडागॉजिकल फ्रेमवर्कस डिफाइन केले आहेत. देशातील प्रत्येक घराने आणि प्रीप्रायमरी शाळांनी आता बालकांची पावलं शाश्वत विकासाच्या मार्गावर धावण्यासाठी सक्षम बनवायची आहेत आणि रिफॉर्म्स आणि ट्रान्सफॉर्मेशन्स आणण्यासाठी सुसज्ज व्हायचे आहे.
(स्तंभलेखिका ‘इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग’च्या प्राध्यापिका आणि प्रथितयश साहित्यिक आहेत.)
••