'बिग बॉस १३' बंद करण्याची प्रेक्षकांची मागणी

    दिनांक :06-Oct-2019
 वादग्रस्त रिॲलिटी शो म्हणून प्रसिद्ध असलेला बिग बॉस कार्यक्रम बंद करण्याची मागणी सध्या प्रेक्षकांकडून होत आहे. सोशल मीडियावरही बिग बॉस १३चा विरोध करण्यात येत आहे. काहींनीतर बिग बॉसचा सूत्रसंचालक सलमान खान याला ट्विटरवर ब्लॉक केल्याचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. बिग बॉसला होणाऱ्या विरोधाच कारण म्हणजे अलीकडेच सुरू झालेला बिग बॉसच्या १३व्या पर्वाची संकल्पना. या पर्वात घरातील सदस्यांना एकमेकांसोबत बेड शेअर करण्यास सांगितले आहे. 
 
 
 
सलमान खाननं स्पर्धकांना घरात एन्ट्री करण्याच्या आगोदरच सदस्यांचा बीएफएफ म्हणजेचं (बेड फ्रेन्ड फोरेव्हर) कोण असेल हे ठरवलं होतं. बीएफएफच्या संकल्पनेनुसार एकाच बेडवर दोन सदस्यांना झोपायचे आहे. घरातील काही महिला सदस्यांनी पुरुष सदस्यांसोबत बेड शेअर केला आहे आणि प्रेक्षकांना नेमकं हेच खटकतंय. अनेकांनी बिग बॉसच्या संकल्पनेचा कडाडून विरोध केला आहे. तर, काहींना बिग बॉस लव्ह जिहादला खतपाणी घालत असल्याचाही आरोप केला आहे.