विघुत प्रवाहच्या शाॅट सर्कीटने शेतातील ऊस जळून खाक

    दिनांक :06-Oct-2019
 शेतकऱ्याचे ४ लाख रुपयांचे नुकसान
 
समुद्रपुर, 
तालुक्यातील विखणी येथिल शेतकऱ्याच्या शेतातील उभ्या ऊसाच्या पिकाला विघुत प्रवाहच्या शाॅट सर्कीटने आग लागल्याने शेतकरी ईश्वरराव आष्टनकार यांचा चार एकरातील ऊस या आगीत जळाल्याने ४ लाख रुपयाचे नुकसान झाले. या आपदामुळे आष्टणकर यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढावल आहे.
 
 
शेतकरी ईश्वरराव आष्टनकार यांनी आपल्या कृष्णापुर शिवारात चार ऐकर शेतजमिनीत उसाची लागवड केली होती उस चांगला बहरला असताना आज अचनाक शेतातून गेलेले विघुत तारेत शाॅट सर्कीट झाल्याने ऊसाच्या पिकाला आग लागली.
घटनेची माहिती गावातील पोलिस पाटील अफरोज सय्यद यांनी सिंदी पोलिसांना देताच पोलिसांनी सिंदी नगरपरिषदेच्या अग्नीशाम दलाला पाठविले मात्र उसाचे पिक दाट असल्याने पिकात आत आगीने रौद्ररूप धारण करून पिकाला खाक केले. वायरमण समिर पिपंळखुटे यांनी विघुत प्रवाह बंद केला, तर गावातील जिल्हा परिषद शिक्षक गणेश कुबडे यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रर्यंत केला मात्र आग वाढतच गेल्याने शेतकरी आष्टनकार यांचा चार एकरातील ऊस जळून खाक झाल्याने त्यांचे ४ लाख रुपयाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यावर मोठ आर्थिक संकट ओढावल आहे.