माता न तू, वैरिणी; दहा महिन्याच्या मुलास आईनेच मारून टाकले विहिरीत

    दिनांक :06-Oct-2019
शेलुबाजार येथील घटना
मंगरुळनाथ,
जन्मदात्या आईने एका दहा महिन्याच्या चिमुकल्याची गळा दाबून हत्या केल्यानंतर त्याचे शव विहिरीत टाकल्याची धक्कादायक  घटना आज रविवारी उघडकीस आली आहे.पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपीना अटक करून हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
 

 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी विठोबा  माहुलकर यांनी दि. ६ रोजी पोलिसांत तक्रार दिली की, दि.  ३ रोजी सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास फिर्यादीची पत्नी संगीता माहुलकर तसेच फिर्यादीचा साळू शरद खुरसडे रा कारंजा यांनी फिर्यादीचा दहा महिन्याचा मुलगा शौर्ययाची गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी  शव शेलुबाजार येथील विहिरीत टाकले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी,अप्पर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली तसेच आरोपिविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.या प्रकरणाचा पुढील तपास सहाययक पोलीस निरीक्षक अतुल तांबे करीत आहेत.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.