पोलीस स्टेशनमध्ये नागाचा धुमाकूळ

    दिनांक :06-Oct-2019
पोलीसांची उडाली तारांबळ
 
गिरड, 
येथिल पोलीस ठाण्यातील कैदी खोलीला लागून असलेल्या मालखान्यातून निघाल्याने पोलीसांची चांगलीच तारांबळ उडाली .शेवटी सर्पमित्रांनी मुक्त संचार करणाऱ्या या नागाला कैद केल्यावर पोलीस कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास घेतला. हा प्रकार रविवार दुपारी उघडकीस आला. गिरड पोलीस ठाण्याच्या मालखाण्यातून दारूसाठा नष्ट करण्यासाठी काढण्यात येत असतांना कर्मचाऱ्यांना नाग दिसला, त्यामुळे ठाण्यात उपस्थित कर्मचाऱ्यांची घाबरगुंडी झाली.
 

 
 
पोलीस ठाण्यातील मालखाना कैद रूमला लागून असल्याने नागाचे ठाण्यातील वास्तव धोक्याचे होते. मालखाण्यात हा नाग किमान दोन तीन महिन्यापासून वास्तव्यास असावा असा अंदाज सर्पमित्रांनी वर्तविला.या खोलीत सापाची कोस आढळून आली.हा नाग पाच फूट २ इंच लांबीचा होता .ठाण्याची जीर्ण आणि जुनी इमारत असल्याने साप उंदराचे वास्तव्य नियमित असते.
पोलीस ठाण्याच्या आतील खोलीत नाग आढळल्यावर पोलीसांनी सर्पमित्र प्रकाश लोहट,अमोल बावने यांनी पाचारण करीत नागाला पकडले. या नागाला खुर्सापार जंगलातील नागवनात सुखरूप सोडण्यात आले.