जालना: वीज पडून तिघांचा मृत्यू

    दिनांक :06-Oct-2019
 
 
जालना,
जालना तालुक्यातील भागडे सावरगावमध्ये वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर सोनदेव या गावात वीज कोसळून दोन महिला जखमी झाल्याचे वृत्त आहे. आज दुपारी २ वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. आज सकाळपासून जालना तालुक्यात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत होता. भागडे सावरगाव येथील सुमनबाई नाईकनवरे यांच्या शेतातील सोयाबीन पिक काढण्याचे काम सुरू होते. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अचानक आकाशात ढग दाटून आले आणि पावसाला सुरवात झाली त्यामुळे सोयाबीन काढणारे काही मजूर शेतातील एका झाडाखाली बसले होते.  याच झाडावर वीज कोसळल्याने भागडे सावरगाव आणि सेवलीमधील  तिघांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोन जण जखमी झाले आहेत. भागडे सावरगावमधील गयाबाई नाईकनवरे, सेवली येथील संदीप पवार आणि मंदाबाई चाफळे  या तिघांचा यात मृत्यू झाला आहे. तर सुमनाबाई  नाईकनवरे, सुनील पवार , सचिन चाफळे हे तिघे जण जखमी झाले आहेत.