तालिबानकडून 3 भारतीय अभियंत्याची सुटका

    दिनांक :07-Oct-2019
नवी दिल्ली,
अफगानिस्तानमधील तालिबान्यांनी तीन भारतीयांची सुटका केली असल्याचे सांगण्यात येत आहे. तालिबानकडून त्यांच्या 11 सदस्यांच्या मोबदल्यात या भारतीयांची सुटका केली असल्याचे म्हटले जात आहे. सुटका करण्यात आलेल्या भारतीयांमध्ये तीनही अभियंते असल्याचे प्रसारमाध्यमांतून सांगण्यात येत आहे. 

 
अफगानिस्तानस्थित तालिबान्यांनी त्यांच्या 11 सदस्यांच्या बदल्यात तीन भारतीय अभियंत्यांना मुक्त केला असल्याचा प्रसारमाध्यमांमधून दावा करण्यात आला आहे. ही देवाण-घेवाण रविवारी रात्री पार पडली आहे. या संदर्भात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अफगाणिस्तानाच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की प्रसारमाध्यमातून समोर आलेल्या माहितीचा आधार घेवून या प्रकरणात अफगाणिस्तानाच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे.तसेच यासंदर्भात माहिती घेवून मगच या प्रकरणावर भाष्य करण्यात येणार असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.