वडिलांच्या ‘त्या’ सल्ल्यामुळेच बदलले झहीरचे आयुष्य

    दिनांक :07-Oct-2019
मुंबई, 
क्रिकेटविषयीचे माझे वेड बघून वडिलांनीच मला सल्ला दिला की, इंजिनिअरिंग सोड आणि क्रिकेट खेळ, असे भारताचा माजी गोलंदाज झहीर खान याने सांगितले. झहीर खान आज 41 वर्षांचा झाला आहे. 

 
 
महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावातून आलेल्या झहीरने भारताला अनेक सामने जिंकून दिले. 2000 मध्ये केनियाविरुद्ध झालेल्या सामन्यात झहीरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सामान्य घरात जन्माला आलेल्या झहीरने शाळेनंतर मॅकेनिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश केला होता. मात्र फावल्या वेळात क्रिकेट खेळण्यात त्याला जास्त आनंद मिळत होता.
 
 
कॉलेजमध्ये असताना झहीर खानची ओळख माजी क्रिकेटपटू सुधीर नाईक यांच्याशी झाली व त्यांनी पूर्ण वेळ क्रिकेटसाठी देण्याची विनंती झहीरला केली. त्यानंतर झहीरच्या वडिलांनी त्याला इंजिनिअरिंग सोडून क्रिकेट खेळण्यास सांगितले. त्यानंतर याच झहीरने भारतासाठी 610 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यात 311 कसोटी, 282 एकदिवसीय आणि 17 टी-20 सामन्यांचा समावेश आहे.