भंडारा जिल्ह्यातील तीन विधानसभांसाठी 39 उमेदवार

    दिनांक :07-Oct-2019
भंडारा,
जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक रिंगणात असलेल्या 71 उमेदवारांपैकी 27 उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता तुमसर विधानसभा मतदार संघात 10, साकोलीत 15 आणि भंडा-यात 15 उमेदवार आपले नशिब आजमावणार आहेत.
 

 
 
भंडारा विधानसभा मतदार संघातून माघार घेणा-या प्रमुख उमेदवारांमध्ये भाजपाचे विद्यमान आमदार रामचंद्र अवसरे, मनसेच्या पुजा ठवकर, भाकपचे हिवराज उके, विकास राऊत यांचा समावेश आहे. साकोलीतून माघार घेणा-या 11 उमेदवारांमध्ये डॉ. ब्रम्हानंद करंजेकर, संजय केवट, चंद्रशेखर टेंभुर्णे यांचा तर तुमसरातील अनिल बावनकर, योगेश सिंगनजुडे यांच्यासह पाच उमेदवारांचा समावेश आहे. उमेदवारी मागे घेतल्यानंतर आज चित्र स्पष्ट झाले असून अपक्ष, वंचित आघाडी आणि बसपाच्या उमेदवारांची भूमिका तिनही विधानसभांमध्ये महत्वाची ठरेल असे चित्र आजच्या घडीला आहे.