धावत्या दुचाकीने घेतला पेट

    दिनांक :07-Oct-2019
  
 
चिखली,
चिखली जवळ अचानक चालत्या गाडीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. रविवारी सकाळी दहा वाजता चिखलीमधील बोचरे डिजिटलचे मालक रामेश्वर बोचरे आणि रुपेश बोचरे हे पिता पुत्र आपल्या स्कुटीने दुकानात जात असताना जालना रोडवरील जलशुद्धीकरण केंद्राच्या जवळ गाडीने अचानक पेट घेतला. यानंतर लगेचच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.