चंद्रपूर येथे रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

    दिनांक :08-Oct-2019
चंद्रपूर, 
चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल  रेल्वे स्थानकाजवळ  रेल्वेची जोरदार धडक बसल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
यापूर्वी ही नाशिक मधील डुबेरे-सोनेरी गावाकडे रात्रीच्या वेळेस रस्त्यावरुन बिबट्याची मादी आणि तीन बछडे जात होते. त्यावेळी रस्त्यावरुन जोरात वेगाने आलेल्या गाडीने बछड्यांना धडक दिली. या धडकेत दोन सहा महिन्यांचा बछड्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता आज पुन्हा एकदा बिबट्याला रेल्वेची धडक लागल्याचा प्रकार घडला आहे