वाशिम-मालेगाव मार्गावर धावत्या स्कुलबसला आग

    दिनांक :09-Oct-2019
मालेगाव,
वाशिम- मालेगाव मार्गावरील शहरालगतच असलेल्या शेलूफाट्यावरील बाबा अॅटो गॅरेज समोरील मार्गावर वाशिमकडून सायंकाळी ८.५० च्या सुमारास येत असलेली टाटा मॅजीकची स्कूलबस मालेगावाला घराकडे येत असताना गाडीने अचानक पेट घेतला.  ही  आग शॉट सर्क्रिट मुळे लागली. गाडीने अचानक पेट घेतल्याने चालकाने गाडी थांबवून घाई-गडबडीत गाडीच्या खाली उतरला तो पर्यन्त गाडी पूर्ण पेटलेली पाहून फाट्यावरील नागरीकांनी धावपळ करुन विझविण्यासाठी धावून आले मात्र तोपर्यन्त गाडी पूर्ण पणेजळून सांगाडाच शिल्लक होता, सुदैवाने जिवित हानी नाही, गाडीत चालकाशिवाय कोणीही नसल्याचे समजते. 
 
 
सदर टाटा मॅजीक स्कूलबस अचानकपणे पूर्ण पेटलेली पाहाल्याने आग विझविणाऱ्या नागरीकांचे मनोबल खचले यावेळी तात्काळ पोलिसांना कळविल्याचे सुत्रांकडून माहीती. रात्री उशीरापर्यन्त पोलिसात सदर घटनेची तक्रार देणेबाबत कारवाई दाखल सुरू होती. सदर टाटा मॅजीक महामार्गावर जळत असतांना रात्री या मार्गावर दोन्ही बाजूंनी काही वेळ वाहाने थांबललेले होते.