बालाकोट हवाई हल्ल्यातील स्क्वाड्रन पदकांनी सन्मानित

    दिनांक :09-Oct-2019
गाझियाबाद,
बालाकोट हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन स्क्वाड्रन आणि भारतीय वायुदलाच्या एका युनिटला मंगळवारी येथे पदके प्रदान करून सन्मानित करण्यात आले. भारतीय वायुदल दिनाच्या निमित्ताने हवाई दलप्रमुख आर. के. एस. भदौरिया यांनी स्क्वाड्रन आणि एक युनिट व नऊ स्क्वाड्रन यांना बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या हल्ल्यातील सहभागाबद्दल पदके प्रदान करून सन्मानित केले.
 

 
 
बालाकोट हल्ल्यातील विंग कमांडर अभिनंदन आणि अन्य वैमानिकांनी या वेळी झालेल्या हवाई कवायतींमध्ये भाग घेतला. पाकिस्तानसमवेत झालेल्या लढाईच्या वेळी अभिनंदन यांनी पाकिस्तानचे एफ-16 लढाऊ विमान पाडले होते. हवाईदल दिनानिमित्त भदौरिया यांनी बालाकोट हल्ल्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या सर्व कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले. सर्व स्क्वाड्रननी असामान्य धैर्य, निर्धार आणि व्यावसायिकता दाखवून भारताचा विजय निश्चित केला.