गुन्हे शाखेकडून धाब्यावर धाड; २ कोटींचे अमली पदार्थ जप्त

    दिनांक :09-Oct-2019
कारंजा लाड,
नागपूर-औरंगाबाद हायवे वर तपोवन नजिक असलेल्या नाशिक धाब्यावर मादक व अमलीपदार्थ असल्याची माहिती रात्री उशिरा जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्या माहीतीच्या आधारे आज दुपारी 3 वाजता कारवाई करण्यात आली. 

 
 
प्राप्त माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नागपूर-औरंगाबाद हायवे तपोवन धाब्यावर मादक व अमली पदार्थची अंदाजे 19 पोती असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आज, दि 9 ऑक्टोबर रोजी दुपारी सापळा रचून गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी धाड टाकली आणि त्या धाडीत 19 पोते पोलिसांना मिळाले. त्याची पाहणी केली असता ती पोती मादक व अमली पदार्थांची असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. माहिती मिळताच पत्रकारांनी तेथे जाऊन सर्व शहानिशा केली. त्यामध्ये अंदाजे 2 कोटी रुपयाचा अमली व मादक पदार्थाचा माल असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.