पुण्याला पुन्हा पावसाचा तडाखा

    दिनांक :09-Oct-2019
पुणे,
पुण्यात पावसाने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असून सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस शहर व परिसरात कोसळत आहे. शहरातील विविध भागांत पाणी साचायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, पुण्यावर १५ किलोमीटर उंचीचे जास्त घनतेचे ढग असून कमी वेळात जास्त पाऊस शक्य असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे पुणेकरांनी पाऊस थांबेपर्यंत व पाणी ओसरेपर्यंत प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

 
 
 
शहरातील सहकार नगर परिसरात रस्ते जलमय झाले असून रस्त्यावरील दुचाकी पूर्णपणे पाण्यात गेल्या आहेत. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या तुफान पावसाने सहकार नगर परिसरात पाचहून अधिक नागरिकांचा बळी घेतला होता. पावसाच्या या आठवणींमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.