मुलं आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे

    दिनांक :01-Nov-2019
प्रॉक्सी थॉट
पल्लवी खताळ-जठार
 
 
सर्वसाधारणपणे मुलांच्या हातात इलेक्ट्रॉनिक उपकरण दिले, की ते शांत बसते, हे वेगळे सांगायची गरज नाही. पण, अनिर्बंध स्क्रीन टाईम मुलांसाठी अजिबात चांगला नाही. स्क्रीन टाईम जास्त असेल, तर स्थूलपणा, आक्रमक वागणूक अशा आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचप्रमाणे मुले समाजापासून तुटतात. मात्र असे काही उपाय आहेत, ज्यांचा उपयोग करून मुलांच्या स्क्रीन टाईमवर मर्यादा आणल्या जाऊ शकतात. तुमचे मूल वेगळे राहू लागले आहे का? तुमच्या मुलाला/मुलीला त्याचे/तिचे आवडते कार्टून पाहायचे असल्यामुळे ती जेवण्यास िंकवा शाळेत जाण्यास टाळाटाळ करत आहे का? सतत टीव्ही, टॅब्लेट िंकवा फोन पाहण्यासाठी तुमचे मूल हट्ट करत आहे का? असे असेल, तर स्क्रीन टाईमवर मर्यादा घालण्यासाठी ताबडतोब पावले उचलणे आवश्यक आहे. कारण, मुलांच्या वाढीसाठी टीव्ही, व्हिडीओे, डीव्हीडी, व्हिडीओे गेम्स आणि कम्प्युटरचा स्क्रीन टाईम शक्य तेवढा कमी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तसे केल्यास तुमचे मूल कृतिशील, सुदृढ आणि निरोगी राहण्यास मदत होईल.
 

 
 
तुमचे मूल उपकरणांना चिकटून बसू नये, यासाठी खालील मार्गदर्शक तत्त्वांचा वापर करता येऊ शकतो.
 
वेळापत्रक निश्चित करा
 
पालकांना आपल्या पाल्यांसाठी नीट वेळापत्रक आखून देणे आवश्यक आहे. तुमचे मूल त्या वेळांचे पालन करत असल्याची खातरजमा करून घेणे आवश्यक आहे. मुलाला दरडावणे िंकवा ओरडणे हितावह नाही. वेळ पाळली जाण्यासाठी तुम्ही टायमरचा वापर करू शकता.
 
तंत्रज्ञानरहित झोन तयार करावा
 
तुम्ही तुमच्या घरात तंत्रज्ञानरहित झोन तयार करावा. म्हणजेच डायिंनग रूममध्ये िंकवा बेडरूममध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप िंकवा टॅब्लेटला मज्जाव करण्यात यावा. असे केल्याने मुलाशी सुसंवाद साधू शकाल, एकमेकांसोबत चांगल्या प्रकारे वेळ घालवू शकाल आणि तुमच्यातील नाते घट्ट होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे तुम्ही डिजिटल-डिटॉक्सचाही विचार करू शकता. (हा असा काळ असतो, ज्यावेळी मोबाईल फोन, कॉम्प्युटर आणि इतर कोणतेही उपकरण वापरायचे नसते, कारण ती व्यक्ती या उपकरणांचा अति वापर करत असते.) त्यामुळे पालकांनी ताबडतोब हे पाऊल उचलणे गरजेचे आहे.
 
मुलं वापरत असलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे
 
सोशल मीडियामध्ये झालेली सुधारणा आणि त्याचे वेड यामुळे मुलांना तंत्रज्ञान पटकन समजते आणि त्यांना इलेक्ट्रॉनिक्सविषयी माहिती असते. त्यामुळे पालक म्हणून तुम्हीही तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळविली पाहिजे. त्यामुळे सोशल मीडियाच्या संभाव्य धोक्यांविषयी तुम्ही तुमच्या मुलांना सांगू शकाल. तुम्हालाच मानांकने माहिती नसतील, तर तुम्ही तुमच्या मुलांना िंहसक गेम खेळण्यापासून परावृत्त करू शकत नाही. म्हणूनच तुम्ही स्वत: तंत्रज्ञानाची माहिती करून घ्या आणि त्याचा तुमच्या मुलांवर काय परिणाम होऊ शकतो, ते जाणून घ्या. तुमची मुले पाहत असलेल्या कार्यक्रमांची माहिती नोंदवून ठेवणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.
 
 
मुलांना इतर इंटरेस्टिंग अॅक्टिव्हिटींसाठी प्रोत्साहन द्या
 
आजकाल मुलांना पट्‌कन इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे व्यसन लागू शकते. त्यामुळे त्यांना सुदृढ जीवनशैली अंगीकारण्यास मदत करा, बागकाम, वाचन, खेळ आणि संगीतासारख्या इतर गोष्टींसाठी प्रोत्साहन द्या. त्यामुळे मुले काहीतरी नवीन शिकू लागतील.
संस्कृत शिक्षिका, महाल, नागपूर