नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करुन शासनाकडे अहवाल सादर करा

    दिनांक :01-Nov-2019
क्रीष्णाभाऊ गजभे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश 

 
 
देसाईगंज,
परतीच्या पावसामुळे तालुक्यात शेतकऱ्यांचे धानपिक बाधित झाले आहे. तसेच संपुर्ण गडचिरोली जिल्हयात पावसामुळे धान पिक धोक्यात आले आहे. विभागिय महसूल प्रशासनाने दखल घेउन शेतकरी बांधवांची समस्येचे निराकरणासाठी सबंधित अधिकाऱ्यांना बाधित झालेल्या पिकांची पाहणी करुन शासनाकडे अहवाल सादर करण्यात यावे, असे निर्देश आरमोरी विधानसभा क्षेञाचे आमदार क्रिष्णाभाऊ गजभे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
 
 
शेतकरी बांधवांचे आर्थीक दृष्ट्या नुकसान टाळणे गरजेचे असल्यामुळे विभागिय महसूल प्रशासनाने दखल घेउन शेतकरी बांधवांवर अन्याय होउ नये याची पुरेपुर खबरदारी घेतली पाहिजे यासाठी सबंधित अधिकाऱ्यांना बाधित झालेल्या पिकांची पाहणी करण्याची सुचना द्या असे निर्देश आरमोरी विधानसभा क्षेञाचे आम क्रिष्णाभाऊ गजभे यांनी आज शुक्रवारी दिले.
 
 
 आज शुक्रवारी आमदार गजबे यांनी धानपिकांची पाहणी केली. यावेळी सभापती मोहनपाटिल गायकवाड, उपसभापती गोपालभाऊ उईके, सुनिल पारधी, रमाकांत ठेंगरी, रोशनीताई पारधी, अर्चना ढोरे, रेवता अलोणे, शेवंता अवसरे आदी पदाधीकारी उपस्थित होते.