अभिषेकने ऐश्वर्याला दिल्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा

    दिनांक :01-Nov-2019
मुंबई,
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आज १ नोव्हेंबरला आपला ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने तिचे चाहते तिला शुभेच्छा देत आहेत. पती अभिषेक बच्चन यानेही ऐश्वर्याला शुभेच्छा दिल्या. पण त्याचा अंदाज एकदम अनोखा होता. अभिषेकने ऐश्वर्याचा अत्यंत सुंदर फोटो शेअर केला आणि तिला चक्क इटालियन भाषेत शुभेच्छा दिल्या. त्यांनी लिहिले, 'हॅपी बर्थ डे प्रिंसीपेसा'. इटालियन भाषेत राजकुमारीला 'प्रिसीपेसा' म्हणतात.

 
अशी माहिती मिळत आहे की ऐश्वर्या सध्या रोममध्ये आहे. तेथे एका इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी ती गेली आहे. ती आपल्या कुटुंबीयांसोबत रोममध्येच आपला वाढदिवस साजरा करणार आहे. असं म्हटलं जातंय की तिच्या वाढदिवसासाठी संपूर्ण बच्चन कुटुंबाने एक सरप्राइज पार्टी प्लान केली आहे.
ऐश्वर्याने २०११ मध्ये गर्भवती झाल्यामुळे सिनेमातून ब्रेक घेतला होता. नंतर २०१५ मध्ये संजय गुप्ताच्या 'जज्बा' या चित्रपटाद्वारे तिने कमबॅक केला होता. ऐश्वर्याचे 'ऐ दिल है मुश्किल' (२०१६) आणि २०१८ मध्ये आलेला 'फन्ने खान' असे दोन सिनेमे त्यानंतर आले. असं म्हटलं जात आहे की ती गुलाब जामुन या आगामी चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत पती अभिषेक बच्चनचीही भूमिका आहे.