ना आमचा विजय, ना तुमचा पराजय...

    दिनांक :10-Nov-2019
|
हे एक असे प्रकरण होते, ज्याची काही आवश्यकताच नव्हती. ही अशी एक सुनावणी होती, जी केवळ प्रकरण न्यायालयात आले म्हणून झाली. हा एक असा वाद होता, जो विनाकारण उभा करण्यात आला होता. ज्या दिवशी रामाच्या जन्मभूमीचे प्रकरण न्यायालयात गेले, त्याच दिवशी निश्चित झाले की काहीतरी निर्णय येणारच आहे, परंतु न्यायाचे काय? हे प्रकरण निर्णयासाठीच न्यायालयात गेले, न्यायासाठी नाही. न्यायालयाचा निर्णय, आम्हा सर्वांना आपला चेहरा भूतकाळाच्या आरशात बघण्याची एक संधी असेल, जेणेकरून आम्ही आपले मूळ ओळखावे आणि भविष्यातील भारताची दिशाही निश्चित करावी.
निर्णय कुठलाही येवो, तो ना आमचा विजय आहे, ना तुमचा पराजय. न्यायालयात जाताच हा खटला आम्ही दोघेही हरलो आहोत. ही हारलेल्या दोन पक्षांची सुनावणी होती, जे मुळात दोन पक्षदेखील नाहीत. कारण, राम केवळ आमचेच नाहीत. तुमचेदेखील तितकेच आहेत. कारण, हा देश केवळ आमचा नाही. तुम्हीदेखील येथेच जन्मले आहात आणि तुम्हाला येथेच दफन व्हायचे आहे. मंदिर आपण दोघांनी एकत्रच उभारले होते. एकत्रच का? ज्यांनी मंदिर उभारले होते, ते एकच होते. आमचे पूर्वज, तुमचे पूर्वज वेगळे नव्हते. ते आता स्वर्गात असतील िंकवा कयामतच्या प्रतीक्षेत असतील. जिथे असतील तिथून ते हा सर्व तमाशा बघत असतील, तर काय विचार करत असतील? ते आम्हाला हसत असतील. तुमच्यावर रडत असतील.
अयोध्या आपल्या सर्वांची आहे. राम आपल्या सर्वांचे आहेत. हा देश आपल्या सर्वांचा आहे. इतिहासाच्या अज्ञानानेच वेगळ्या ओळखीचा संशय निर्माण केला आहे. सत्तर वर्षांत या देशाचे सर्वात अधिक नुकसान ज्या सेक्युलॅरिझमने केले, तितके तर आठशे-हजार वर्षांच्या विदेशी शासकांनी गुलाम बनवूनही केले नसेल. कमीतकमी त्यांचा उद्देश तरी स्पष्ट होता. त्या काळात हे तर निश्चित होते की, आम्ही त्यांचे गुलाम आहोत आणि ते आमच्यावर राज्य करत आहेत. वाटेल तेव्हा मंदिरांना जमीनदोस्त करून टाकतील. जिथे वाटले तिथे आम्हाला अपमानित करतील. मनात आले तिथली ओळख बदलून टाकतील. वाटेत तितके लुटतील. नाराज झाले तर कत्तली करतील. कोण काय वाकडे करणार? ते असे करत राहिले.
ते सुलतान होते. ते बाहशाह होते. ते नवाब होते. ते निजाम होते. ते गव्हर्नर जनरल होते. ते व्हाईसरॉय होते. त्यांच्या हातात तलवारी होत्या. तोफा होत्या. बंदुका होत्या. चाबूक होते. आसूड होते. त्यांच्यासमोर जे होते ते आम्ही होतो. आम्हीपण, तुम्हीपण. आसुडांचे वळ आम्हा दोघांचाही पाठीवर आहेत. चेहर्‍यांवर बदललेली ओळख चिपकली आहे. तलवारींनी आपल्या दोघांचेही रक्त सांडवले आहे. तोफांसमोर आपल्या दोघांच्याही चिथड्या उडाल्या आहेत. सळाखींच्या मागे आपल्या दोघांनाही डांबण्यात आले आहे.
 
 
 
आपण या देशाच्या घायाळ भूतकाळातील असे पात्र आहोत, जे कधी वेगळे नव्हतोच. आपण इथलेच होतो. ते बाहेरून आले होते. त्यांनी येथे कब्जा केला. एकानंतर दुसर्‍याने कब्जा केला. आमच्यावर अत्याचार केलेत. आपल्यातीलच काहींची ओळख बदलून टाकली. बरेच जण आपली ओळख वाचविण्यासाठी पळत राहिले. बदललेली ओळख तर फक्त एक नाव आहे. त्याने धमनीत वाहणारे रक्त थोडेच बदलले! ते तर एकच आहे. जुळवून तपासून घ्या!
आम्ही वेगळे नाहीतच; एकच आहोत, याचे स्मरण करून देणार्‍या त्या घायाळ भूतकाळाला, स्वातंत्र्यानंतर सेक्युलॅरिझमने स्वत:च्या स्वार्थापायी झाकून ठेवले. शतकानुशतके आमचे अपमानित पूर्वज एकच होते, तरीही या सेक्युलरवाद्यांनी मानले की तुम्ही एक नाहीत, वेगळे आहोत. आमच्यात कुठला समन्वय शक्यच नाही. तुम्हाला तुमच्या वेगळ्या झालेल्या ओळखीसह एक वेगळा भूभाग हवा आहे. आणि तसे झालेही. 1947 साली ते वेगळे झालेत. सीमारेषा आखली गेली. वेगळ्या ओळखीसह स्वत:चा वेगळा देश निर्माण केला गेला. जिन्नाने त्याला पाकिस्तान म्हटले. खरेतर, जिन्ना स्वत: दोन पिढ्यांपूर्वी बदललेल्या ओळखीचे एक कमनशिबी पात्र होते. फक्त दोन पिढ्या! शंभर वर्षांमध्ये त्यांच्या आजोबाचे आणि वडिलांचे नाव काय होते? कुठे वेगळे होते ते?
हा केवळ कालांतराचा खेळ आहे. जिन्ना दोन पिढ्यांपूर्वी िंहदू ठक्कर होते. कुणी चार पिढ्यांपूर्वी काही वेगळे होते. कुणी सहा पिढ्यांपूर्वी वेगळे झाले होते. कुणाला सात पिढ्या झाल्या असतील. त्याच्याआधी तर सर्व इथेच होते. कोण कुणापासून वेगळा होता? कुणी वेगळे करून टाकले? कसे वेगळे झाले? रक्तगट बदलला का? दोनऐवजी तीन किडन्या झाल्यात का? डोळे काही वेगळेच पाहू लागलेत का? कानांना काही वेगळेच सूर ऐकू येऊ लागले का? हृदय वेगळ्याप्रकारे धडकू लागले का?
आठ-दहा पिढ्यांच्या या भटकंतीच्याही हजारो वर्षे आधीपासून राम आपले आहेत. आपल्या पूर्वजांनीच त्याच्या कथा आपल्यापर्यंत पोहोचविल्या. त्यांनीच अलौकिक मूर्ती बनविल्या. आश्चर्यचकित करणारी मंदिरे उभारलीत. ही तोडफोड तर काही शतकांचीच धडपड आहे. ते अत्यंत क्रूर लोक बाहेरून आले आणि मंदिरांना तोडून मशिदी बनविल्या. हातात तलवार होती. तिथल्याच पुजार्‍याला रिझवान बनवून टाकले. पुजारी आधी मंदिरात पूजा करत होता. रिझवान झाला तर त्याच मशिदीत जाऊ लागला. आता तो म्हणत आहे की, हे आमचे प्रार्थनास्थळ आहे. आम्ही म्हणतो, तू रामभक्त पुजारी आहेस. एकुणात हे असे प्रकरण आहे. उपासना पद्धती बदलल्याने नागरिकत्व थोडेच बदलते!
रामाच्या जन्मभूमीवरून कुणी कसा न्यायालयात भांडू शकतो? जर हे असे झाले आहे, तर ते ‘ओरिजिनल मेमरी’शी ‘डिस्कनेक्ट’ होणेच म्हणावे लागेल. थोड्या वेळासाठी ‘कनेक्ट’ होऊन विचार करा. सर्वांना स्वत:च्या आत रामच झळकताना दिसतील. तेव्हा थोपवलेली ओळख क्षणात गळून पडेल. डोळ्यांतून अश्रू वाहू लागतील. आपण आतापर्यंत जे केले त्याचा पश्चात्ताप होऊ लागेल. या मातीत आपल्या सर्वांच्या पिढ्या जगल्या आहेत आणि याच मातीत त्या मिसळल्याही आहेत. जे काही भोगले, ते सर्व आपले आहे. ना कुणी िंजकले आहे, ना कुणी हरले आहे. आपल्याच लोकांशी कुणी कसा िंजकेल? आपल्याच लोकांकडून कुणी कसा हरेल? परंतु, आम्ही आपल्या लोकांकडून हरलो आहोत. आम्हाला दुसरा कोण हरविणार? आपल्याच लोकांच्या कपटाने प्रत्येक शतकात आम्हाला घायाळ केले आहे. रक्तबंबाळ केले आहे. हे कपटी कधी सुलतान बनून आले, कधी सेक्युलरांच्या वेषात आले.
देशाचे तुकडे करूनही ज्यांचे समाधान झाले नाही, ते स्वार्थी स्वातंत्र्य मिळताच काही शतकांच्या वेगळ्या ओळखीला अधिक वेगळे करण्याच्या मागे लागले. ते फुटीरतेला पोसत राहिले. आपण खरेच वेगळे आहोत, या संभ्रमात तुम्ही पडलात. आमची ओळख वेगळी आहे. तुम्हाला समजलेच नाही आणि त्या कपटींनी तुम्हाला ‘व्होट बँक’ बनवून टाकले.
एका समजूतदार आणि जिवंत समाजावर ‘व्होट बँके’चा शिक्का बसला आणि अयोध्येत अटकलेल्या कुणा जिलानी, गिलानी, अंसारी आणि धवनच्या चेहर्‍यावर आठीदेखील पडली नाही. आम्ही एक समजूतदार समाज आहोत, कुणी आम्हाला व्होट बँक कसे काय म्हणू शकतो, याचे कुठल्याही वक्फ बोर्ड िंकवा पर्सनल लॉ बोर्डाला वाईट वाटले नाही. आम्ही काही खास नाही आहोत. आम्ही या देशाचे कुशल, दक्ष नागरिक आहोत. खबरदार, कुणी आम्हाला व्होट बँक मानले तर!
सेक्युलॅरिझमच्या नावावर व्होट बँकेवर डाका घालण्याचा एकाधिकार तर त्या राजकीय कपटी लोकांकडेच कायम राहिला. केव्हापासून ही दरोडेखोरी सुरू आहे? दरोडेखोरांच्या या टोळ्या दिल्लीपासून ते प्रत्येक प्रांतात पसरलेल्या आहेत. त्यांनी तुमचे सर्व काही लुटले. जे रामाच्या संयुक्त वारशापासून तुटले आणि सेक्युलर कपटी लोकांच्या जाळ्यात अडकून, आपल्या वेगळ्या ओळखीचा आव आणत सीमापार गेले, तिथे त्यांच्या तोंडावर जाहीरपणे पडणारी ‘मुहाजिर’ची शिवी सार्‍या जगाने ऐकली आहे. घरचे ना घाटाचे राहिलेत ते. इथेही फसविले गेले आणि तिथेही अपमानित झाले. ही वस्तुस्थिती समजून घेण्याची संधी न्यायालयाच्या या निर्णयाने मिळणार आहे.
 
किती खेदाची गोष्ट आहे. किती शोकजनक आहे. आम्ही कुठे राहिलो असतो अन्‌ कुठे पोहोचलो आहोत. धमनीत वाहणारे एकच रक्त, एकदुसर्‍याच्या जिवावर उठले आहे. दहा दशकांपासून हे रक्त वाहात आहे. सीमा रक्तबंबाळ आहे. आम्हा सर्वांचा भूतकाळ एक आहे. भूतकाळात आम्ही सर्व एक होतो. जी काही वैशिष्ट्ये होती, आमची होती. जे काही दोष होते, आमचे होते. ज्या काही चुका केल्यात, त्याही आमच्या होत्या. सुधारू शकणार नाही अशी कुठलीच चूक नसते. दुरुस्त करता येणार नाही असा कुठलाच दोष नसतो. आमच्या चुका आणि आमच्या दोषांचा फायदा त्या कपटी लोकांनी उचलला, जे बाहेरचे होते. स्वातंत्र्यानंतर या कपटी लोकांचे ‘स्थानिकीकरण’ झाले. ज्यांना दया नव्हती, लाज नव्हती, ते आता आमच्यातलेच झालेत. ते लुटलेल्यांनाच लुटू लागले. मेलेल्यांनाच मारू लागले. आता तोफा, बंदुका आणि आसूड नव्हते, गोड जाहीरनामे होते. भाषणे होती. आश्वासने होती. परंतु, त्यांचे मन तितकेच काळे होते. ते तुम्हाला शेळ्या-मेंढ्यांप्रमाणे हाकत राहिले. समाजाचे काय भले केले?
काहीही असो, न्यायालयाचा निर्णय आपल्या सर्वांना एक संधी आहे. मौन होऊन स्वत:चा चेहरा आरशात बघण्याची एक सुवर्णसंधी. आम्ही स्वत:ला बघावे. आपला चेहरा बघावा. ओळखण्याचा प्रयत्न करावा. स्वत:लाही आणि कपटी लोकांनाही. आम्ही आपली मूळ ओळख शोधावी. ती काळाच्या पडद्याआड लपली आहे. नाहीशी तर नक्कीच झाली नाही. काळाच्या पडद्यापार या देशाला कुठलीच सीमा नाही. कुठलीच वेगळी ओळख नाही. शांती, अिंहसा आणि त्यागाची लखलखती ओळख आहे. ती आपल्या सर्वांची आहे. त्याच्यामागे रामाची कथा आहे. राम अयोध्येचे होते. तिथेच जन्मले होते. हाताशी आलेले राज्य सोडून 14 वर्षे जंगलात भटकले होते. वनवासातीलही अनेक कथा आहेत. मैत्रीच्या कथा. नात्यांच्या कथा. चांगुलपणाच्या कथा. ते परतून अयोध्येच आले होते. मंदिराच्या मलब्यावर उभ्या हजारो ढाच्यांमध्येही आता काही आठवणी शिल्लक आहेत. राम म्हणजे कधीच न विझणारा एक दिवा आहे. ज्यांनी शतकानुशतके मंदिरे तोडलीत, ते सर्व मातीत मिसळले. त्यांच्या विषारी वारशाला कुणी का म्हणून धरून ठेवावे? आणि राम कुठे संपले आहेत? ते तर आमच्या आत प्रकाशित आहेत. जग त्यांचे उदाहरण देते. आता न्यायालयाचा निर्णय काहीही लागो, तो ना आमचा विजय आहे, ना तुमचा पराजय. आम्ही समोरासमोर उभे ठाकलेले दोन पक्ष नाही आहोत. आम्ही एकच आहोत. एकच होतो. राम आम्हा सर्वांचे आहेत. अयोध्या आम्हा सर्वांची आहे. आमचे पूर्वज एक होते.
••