गंधर्व लोकीचा ‘राजहंस’

    दिनांक :10-Nov-2019
|
1901 मध्ये भाऊराव कोल्हटकर यांच्या मृत्यू नंतर मराठी रंगभूमी च्या अध:पतनाला सुरुवात झाली आणि नेमके तेव्हाच 1905 मध्ये एका गुणी कलाकाराने मराठी रंगभूमीची इमारत परत मजबूत केली. 26 जून सन 1888 साली, सांगली श्रीपाद राजहंस यांना पुत्र रत्न प्राप्त झाले आणि त्यांचं नाव नारायण राजहंस. बालपणापासूनच नारायणा ला गायनाची आवड होती आणि पुढे त्यांनी भास्करबुवा बखले यांचं शिष्यत्व पत्करले. भास्कर बुवा बखले यांच्या एका कार्यक्रमात स्वतः लोकमान्य टिळक उपस्थित होते. नारायणाचे गायन ऐकून इतके प्रभावित झाले की टिळकांनी त्याला पाठ थोपटून बालगंधर्व असे पुकारले.
 
 
 
बालगंधर्वांचा जीवनपट फारच प्रेरणादायी आहे. 25 ऑक्टोबर 1905 मध्ये किर्लोस्कर नाटक मंडळी मध्ये प्रवेश करून 1911 मध्ये मानापमान नाटकात भामिनीची भूमिका व 1913 ला विद्याहरणमध्ये देवयानीची भूमिका करून रसिकांची मनं िंजकली.
 
 
 
पुढं बालगंधर्वांनी किर्लोस्कर नाटक मंडळामधून काढता पाय घेत गोिंवदराव टेंबे आणि गणपतराव बोडस यांच्या भागीदारीत गंधर्व नाटक मंडळाची सुरुवात सुद्धा केली. नाटकां व्यतिरिक्त बालगंधर्व व्ही. शांताराम दिग्दर्शित धर्मात्मा या सिनेमात सुद्धा उत्कृष्ट कामगिरी केली आहे. बालगंधर्वांचा चढ उतारानी भरलेला हा प्रवास खरच प्रेरणादायी आहे. बालगंधर्वांना 1955 मध्ये संगीत नाटक अकादमी तर 1964 ला पद्मभूषण किताब देऊन गौरवण्यात आले. 1955 मध्ये स्वयंवर नाटकात रुख्मिणी ची भूमिका आणि एकाच प्याला मधील िंसधू ची भूमिका करून त्यांनी अभिनय आणि गायनाला पूर्ण विराम दिला. बालगंधर्व 80 वर्षाचे असताना पू. ल. देशपांडे यांच्या पुढाकाराने पुण्यात बालगंधर्व रंगमंदिराची स्थापना झाली आणि इथल्या पहिल्या प्रयोगाचा पडदा स्वतः बालगंधर्वांनी उघडला.. असा हा गंधर्वलोकीचा कलावंत 15 जुलै 1967 ला काळाच्या पडद्याआड गेला. खरचं असा गायक आणि नट होणे नाही.
 
 
चेतन गाडगे
 
9922433413