घातक ‘फोन फोबिया!’

    दिनांक :10-Nov-2019
|
आज प्रत्येकाला मोबाईलची इतकी सवय झाली आहे, की- तो हातात नसला तर लोकं अस्वस्थ होतात. सतत फोनवर बोलण्याने की सतत फोन वापरल्याने अनेक शारीरिक आजार तर होतातच पण त्याच बरोबर मानसिक आजार देखील होतात.
 
 
 
मोबाईल फोन ही सोय आहे की व्यसन आहे, असा प्रश्न अनेकदा मनात येतो, कारण हातात फोन पकडलेली तरुण पिढी फोनच्या इतकी आहारी गेली आहे, की- दुसरी सगळी कामे सोडून सातत्याने मोबाईलवर बोलत तरी बसले असते िंकवा मोबाईलमधले अन्य उद्योग करत बसलेली असते. या सवयीचा फार घातक परिणाम आरोग्यावर होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. अशा प्रकारे सातत्याने मोबाईल बघण्याने आपल्या आसपासच्या वातावरणाशी असलेला आपला संबंध तुटतो, ही गोष्ट या तज्ज्ञांनी लक्षात आणून दिली आहे.
 
 
मोबाईल फोन हा आपला एक अवयवच झालेला आहे, इतकी लोकांना त्याची सवय झालेली आहे. मात्र ही सवय विकृतीत बदलली आहे की काय, असे वाटते. तशी ती बदलली नसेल तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु त्यासाठी एक परीक्षा घेतली पाहिजे. ज्या लोकांना मोबाईलचे व्यसन लाकगलेले असते ते मोबाईलशिवाय पाच मिनिटेसुद्धा स्वस्थपणे जगू शकत नाहीत.
 
 
त्यासाठी घरी मोबाईल ठेवून बाहेर फिरायला जावे. मोबाईलच्या आहारी गेलेला माणूस अशा वेळी जवळ मोबाईल नाही म्हणून चिडचिडा होतो. मात्र जो अजून मोबाईलच्या आहारी गेलेला नाही, तो माणूस मोबाईल जवळ नसला तरीही शांतपणे वागतो. अनेक लोकांना खिशात मोबाईल नसेल तर काही तरी हरवल्यासारखे वाटते. मात्र जे लोक त्याच्या आहारी गेलेले नाहीत ते लोक मोबाईलशिवाय छान जगू शकतात.
 
 
मोबाईलचे हे व्यसन इतके वाढले आहे की काही लोकांना भास होण्यास सुरूवात झाली आहे. जसे फोन ‘व्हायब्रेट’ होतो आहे िंकवा आपल्यला काही ‘नोटीफिकेशन’ आले आहे, असे भास त्यांना होत असतात. यावर उपाय एकच गरज असेल तिथेच आणि तेवढाच फोन वापरा. कौटुंबिक वेळात फोन बंद िंकवा लांब ठेवणे. कार्यालयातून आल्यावर शक्यतो फोनचा वापर टाळावा. असे केल्यास आपले व आपल्यासोबतच इतरांचे आरोग्य चांगले राहते.
 
जुई गडकरी
 
8308178899