आर्वी येथे दत्तोपंत ठेंगडी यांची जयंती साजरी

    दिनांक :11-Nov-2019
|
नागपूर, 
नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ इन्शुअरन्स वर्कर्स या विमा क्षेत्रात कार्यरत संघटनेच्या वतीने रविवारी दत्तोपंत ठेंगडी यांची जयंती आर्वी या त्यांच्या जन्मगावी साजरी करण्यात आली. 

 
 
देशभरातील कामगारांचे मार्गदर्शक दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दी वर्षांत एनओआयडब्ल्यूच्या वतीने वर्षभर विभिन्न कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात आर्वीतील कार्यक्रमाने झाली. नागपूर आणि अमरावती विभागातील कार्यकर्ते या कार्यक्रमाला मोठ्या सं‘येने उपस्थित होते. एनओआयडब्ल्यूचे राष्ट्रीय अध्यक्ष अतुल देशपांडे यावेळी उपस्थित होते.
 
 
आयुर्विमा महामंडळाच्या आर्वी शाखेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना अतुल देशपांडे यांनी सांगितले की, एनओआयडब्ल्यूची विमा क्षेत्रात वाटचाल ही दत्तोपंत ठेंगडी यांनी दिलेल्या विचारांवर काम करूनच 1969 पासून निरंतर सुरू आहे. संघटनेने विमा क्षेत्रात काम करताना 50 वर्षे पूर्ण केली आहेत. कामगारांच्या अनेक समस्यांचे निराकरण केले. कर्मचार्‍यांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केले. यापुढेही कामगारांमध्ये कार्य करताना, त्यांच्या विचारांवरच मार्गक‘मण करण्यात येईल. कार्यक्रमानंतर उपस्थित सदस्यांनी दत्तोपंतांच्या निवासस्थानाच्या वास्तूचे दर्शन घेतले.