आमिरचा ‘लाल सिंग चढ्ढा’मधील लूक व्हायरल

    दिनांक :11-Nov-2019
|
वर्षभरात एकच चित्रपट हे गणित कसोशीने सांभाळणारा बॉलिवूड अभिनेता आमिर खान ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ या चित्रपटानंतर ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची चर्चा रंगत असून त्याचा या चित्रपटातील लूक लीक झाला आहे. विशेष म्हणजे आमिर या नव्या लूकमध्ये प्रचंड वेगळा दिसत आहे.

 
 
 
सध्या आमिरच्या नव्या लूकचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या चित्रपटामध्ये आमिरने एका शीख व्यक्तीची भूमिका साकारली असून त्याचा लूकदेखील त्याचप्रमाणे आहे. व्हायपल होत असलेल्या फोटोमध्ये आमिरने हलक्या गुलाबी रंगाची पगडी, स्पोर्ट्स शूज, चौकटींचं शर्ट, दाढी अशा लूकमध्ये दिसून येत आहे.
दरम्यान, या चित्रपटामध्ये अभिनेत्री करिना कपूर स्क्रीन शेअर करणार आहे. ‘३ इडियट्स’ चित्रपटानंतर पुन्हा एकदा ही जोडी एकत्र झळकणार आहे. या चित्रपटासाठी आमिर प्रचंड मेहनत करत आहे. त्याने जवळपास २० किलो वजनदेखील कमी केलं आहे.