फसवणुकीच्या गुन्ह्यात दोघांना अटक

    दिनांक :12-Nov-2019
|
आर्वीत सहा लाख 90 हजार अफरातफर प्रकरण
 
आर्वी,
आर्वी पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून दोघा आरोपींना मंगळवारी सहा लाख 90 हजाराच्या अफरातफर केलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. हा गुन्हा 15 मार्च 2019 ते 12 ऑक्टोबर20 19 पर्यंत पोलिसांनी चौकशीत ठेवला होता त्यानंतर 17 नोव्हेंबर 2019 ला गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. देविदास साठे राहनार आर्वी असे फिर्यादीचे नाव असून स्वपना गणेश्वर सपकाळ आणि होरेश्वर सिताराम सपकाळ असे आरोपीचे नाव आहे या आरोपींना पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर उपस्थित केले होते.
 
 
मिळालेल्या माहितीनुसार देविदास साठे यांना या दोघा आरोपींनी सुपरलाइफ मार्फत होंडा कंपनीची कोणतीही दुचाकी गाडी ही सूटवर देतो अशी बतावणी करून आर्वी व कारंजा शहरातील लोकांकडून नगदी 35,000 रुपये घेतले परंतु त्यांना दुचाकी न देता या लोकांची सहा लाख 90 हजार ने फसवणूक करून अफरातफर केली. त्या संदर्भात पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून या दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आणि येथील न्यायालयासमोर या दोघा आरोपींना पोलिसांनी उभे केले असता प्रथम श्रेणी न्यायाधीश त्रिवेणी गायगोले यांनी सपना सपकाळ यांना जमानत दिली तर होरेशवर सपकाळ याला 17 नोव्हेंबर 2019 पर्यंत पोलीस कोठडी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.