वर्धा जिल्हात २४ तासांत २ बलात्काराच्या घटना

    दिनांक :14-Nov-2019
|
 
 
 
वर्धा,
वर्धा जिल्ह्यात २४ तासांत दोन बलात्काराच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. पहिली घटना कारंजा (घाडगे) या परिसरातील ८ वर्षीय चिमुकलीवर शेजारी असलेल्या पानटपरीच्या बाजूला जोर जबरदस्ती केल्याचं उघड झाले आहेय.भीमराव ढोले असं आरोपीच नाव असून त्याला कारंजा पोलिसांनी अटक केली आहेय.तर दुसरी घटना सेवाग्राम हद्दीतील घडली असून ४२ वर्ष महिलेवर जबरदस्तीने अतिप्रसंग करण्यात आला आहेय.कुणाल वाळके असं आरोपीचं नाव असून त्याला काही तासातच सेवाग्राम पोलिसांनी अटक केली आहे.आरोपीने रात्री १ च्या सुमारास जबरदस्तीने हा प्रसंग करण्यात आला असे तक्रारीत नमूद केले असून आज न्यायालयात पोलिसांकडून न्यायालयीन कोठडी मागण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहेय.या घटनेचा तपास सेवाग्राम पोलीस उपनिरीक्षक गजानन कंगाले करीत आहे.