बांगडापूर येथे जंगल परिषद गाजली

    दिनांक :14-Nov-2019
|
 
 
 
कारंजा,
तालुक्यातील सर्वच गावातील शेतकरी वन्य प्राण्यांच्या हैदोसमुळे शेतकरी हतबल झाले असुन तालूक्यात आज बांगडापूर येथे शेतकरी जागर मंच द्वारे जंगल परिषद घेण्यात आली त्यावेळी हजारोंच्या संख्खेने शेतकरी आणि मान्यवर उपस्थीत होते .
जंगली प्राण्यामुळे गेल्या काही दिवसात शेतीचे मोठे नुकसान झाले याशिवाय आगरगाव येथे युवा शेताक्रयवार वघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला तर पाळीव जनावरावर मोठ्या प्रमाणत हल्ले झाले, त्यामूळे शेतकरी शेतात जाण्याकरिता भिती पसरली यामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्याने तुटपुंजी मदत मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. याकरिता आज शेतकरी, शेतमजुर सविधनीक मार्गाने जंगल परिषद घेऊन मागण्या मांडण्यात आला. जंगली प्राण्याच्या त्रासापासून सरक्षण देण्यात यावे,जंगली प्राण्यामुळे होणारया संदर्भात नुकसान भरपाई बाबत नविन सूत्र तयार करुन योग्य ती मदत विशिष्ट मूदतीत देण्यात यावी. शेती जंगल व जंगली प्राणी या विषयी पुढिल भविष्यात निर्माण होण्याचा समस्ये बाबत विचार करणेबाबत ,वनविभागच्या जंगलाला सुरक्षा भिंत व कुंपण करावे, शेतीचे वन्य प्राण्यापासून होणारया नुकसानीचा तातडीने पंचनामे करुन तुटपुंजी मदत न देता एकरी 25 हजार मदत जाहीर करावी, वन्य प्राण्यामुळे होणारया जिवित हानी 50 लाखाची मदत द्यावी ,सर्पदंश झाल्यास मृतकाचया नतेवाईकांना आर्थिक मदत द्यावी या सर्व मागण्या पुर्ण होन्यासाठी आज हजारो च्या सन्ख्खेत शेतकरी शेतमजुर उपस्थीत होते यावेळी संचालन चंद्र शेखर डोईफोडे, आभार सूनिळ ढोले यानी मानले.