तामिळ भाषा शिकणे सोपं नाही- कंगना

    दिनांक :14-Nov-2019
|
 
 
 
 
 
कंगना रनौट लवकरच 'थलाइवी' नावाच्या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. जयललिता यांची भूमिका अधिकाधिक नेमकेपणानं साकारता यावी, यासाठी कंगना तमीळ भाषा शिकते आहे. परंतु, तमीळ शिकणं तिला प्रचंड अवघड काम वाटतंय. तमिळ भाषेचे धडे गिरवणारी कंगना म्हणते, 'हा बायोपिक हिंदी आणि तमिळ अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे त्यामुळे मला या बायोपिकसाठी तमिळ भाषा शिकणं फार गरजेचं आहे. परंतु, ही नवी भाषा शिकणं मला खूप अवघड वाटतंय. तमिळ भाषा अजबिता सोपी नाही, ती शिकणं प्रंचड अवघड आहे. परंतु, मला या भाषेत डायलॉग्स बोलायचे असल्याने मला तमिळ शिकण्याशिवाय पर्याय नाही. लवकरच मला तमिळ बोलता येईल अशी अपेक्षा मी करतेय' असं ती म्हणाली. या बायोपिकसाठी कंगना तमीळ भाषा शिकते आहेच; त्याबरोबर ती नृत्यावरही काम करते आहे. नृत्याचे शिक्षण घेतानाचा तिचा एक व्हिडिओही प्रसिद्ध झाला आहे. जयललिता यांची भूमिका साकारण्यासाठी कंगना प्रचंड मेहनत घेते आहे. याबाबत बोलताना ती म्हणाली,' जयललिता यांची भूमिका साकारण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. मला आमच्या दोघींमध्ये बऱ्याच बाबतीत साम्य आढळते. परंतु, ही भूमिका मला अधिक उत्तमरित्या पडद्यावर साकारता यावी, ती प्रेक्षकांना खरी वाटावी यासाठी मी तामीळ शिकते आहे. मला नेहमीच प्रादेशिक भाषांमध्ये चित्रपट करायचे होते. माझ्या चित्रपटांचे प्रमोशन करताना मी वेगवगेळ्या राज्यांत फिरायचे तेव्हा मला जाणवलं होतं की प्रादेशिक सिनेमा बनवणाऱ्यांकडे किती जबरदस्त आशय आहे. मी एका चांगल्या स्क्रिप्टच्या प्रतीक्षेत होते आणि या चित्रपटामुळे मला ती मिळाली.'