चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या

    दिनांक :14-Nov-2019
|
 
 
 
मंगरुळनाथ,
चारित्र्याच्या संशयावरून पतीने डोक्यावर जड वस्तूने मारून पत्नीची हत्या केल्याची घटना तालुक्यातील पोघात येथे 13 नोव्हेंबर चे रात्री घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी रोशन खान रशीद खान रा. पोघात यांनी तक्रार दिली की, 13 नोव्हेंबर चे रात्री फिर्यादीची आई नजीराबी ही फिर्यादीचे घरी आली व आरोपी एजाज खान रोशन खान याने त्याची पत्नी बिलकीस बी  ही झोपेत असतांना तिच्या डोक्यावर काहीतरी जड वस्तू मारून हत्या केल्याची माहिती दिली. आरोपीने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला जीवाने मारले आहे. अशा फिर्यादीवरून पोलिसांनी कलम 302,201 नुसार गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक केली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलिस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे, ठाणेदार विनोद दिघोरे, पीएसआय मंजुषा मोरे, पीएसआय प्रमोद सोनवणे, सुषमा परंडे, हेकॉ अंबादास राठोड, साहेबराव राऊत, एएसआय भगत, संदीप खडसे, उमेश ठाकरे, अमोल मुंदे, किशोर काकडे, मोहम्मद परसुवाले, गोपाल कवर, मिलिंद भगत, सचिन शिंदे, होमगार्ड शितलदास उचित यांनी घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा तपास पीएसआय मंजुषा मोरे करीत आहेत.
घटनेतील आरोपी हा विष पिऊन आत्महत्या करण्याचे तयारीत होता तसेच त्याच्या हातातून पोलिसांनी विषाची बॉटल जप्त करून किन्हीराजा येथून तात्काळ सापळा रचून शिताफीने अटक केली. आरोपीची मानसिक स्थिती बरी नसल्याने पोलिस कोठडीची मागणी राखून ठेऊन न्यायालयीन कोठडीची मागणी केली. तसेच न्यायालयाने सदर मागणी मान्य करून आरोपीची रवानगी जिल्हा कारागृह वाशीम येथे केली. सदर आरोपीस दोन तासात अटक केल्याने पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी पोलिसांची प्रशंसा केली आहे.