पवारांच्या ताफ्यातील गाडीची दुचाकीला धडक

    दिनांक :14-Nov-2019
|
 

 
 
नागपूर,
नागपूर जिल्ह्यातील भारसिंगी वरून खापाकडे जाताना जामगाव जवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातील एका वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून बाईकचे ही नुकसान झाले आहे. धडक देणारी बोलेरो MH 31 DZ 0770 ही गाडी शरद पवार यांच्या वाहनाच्या 4 ते 5 वाहन मागे चालत होती. अचानक ब्रेक लागल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. पवार यांच्या ताफ्यातील एमबुलेन्स मध्ये जखमी तरुणाला लगेच जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले आहे.