वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

    दिनांक :15-Nov-2019
|
 
 
ब्रम्हपुरी,
तालुक्यातील भगवानपूर (चोरटी)येथील देवकण्या चौधरी शेतकरी महिला गुरुवारी सकाळी 11 वाजता नेहमी प्रमाणे आपल्या पती सोबत गावापासून 1 किलो मीटर अंतरावर असलेल्या स्वतःच्या शेतात धान कापून झाल्याने शेतात पडलेला सर्वां गेली असता दुपारी तीन ते चारच्या दरम्यानदबा धरून बसलेल्या वाघांनी तिच्यावर हल्ला चढवला व जागीच ठार केला. त्या वेळी शेता जवळ धान कापणी व बांधणी करणाऱ्या काही महिला व पुरुषांना महिलेच्या ओरडण्याचा आवाज आला असता त्यांनी त्या आवाजाकडे दुर्लक्ष केले.  दरम्यान तिचे पती काही काम असल्याने घरी आले असता काही महिलांनी तिच्या पतीला घटने बद्दल कळविले.  पतीने शेता लगतच्या परिसरात शोधाशोध केली शेतात जाऊन बघितले असता पत्नी दिसून आली नाही व शेतात वाघाच्या पायाचे ठसे दिसून आल्याने त्यांनी ही माहिती गावकरी व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली असता गावकरी व वन विभागाचे कर्मचार्यांनी शोध मोहीम सुरू केली परंतु रात्र झाल्याने पत्ता लागला नाही आज सकाळीच गावकरी व वन विभागाचे कर्मचारी परत शोध मोहीम सुरू केल्याने त्यांच्या शेता पासुन काही अंतरावर असलेल्या शेतात तिचा मुतदेह दिसून आला .या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्वरित नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करून पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.