क्रिकेट व राजकारणात सर्व शक्य नितीन गडकरी यांची गुगली

    दिनांक :15-Nov-2019
|
मुंबई,
क्रिकेट आणि राजकारणात अशक्य असे काहीच नाही. ही दोन अशी क्षेत्रे आहेत, जिथे काहीही होऊ शकते. बर्‍याचदा पराभूत होत असलेला क्रिकेटचा संघ नंतर मात्र विजयी झाल्याचे आपण बघतो, अशी जोरदार गुगली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टाकली.
भाजपाच्या तुलनेत अर्ध्या जागा मिळाल्यानंतरही महायुतीतील एक घटक पक्ष दोन कॉंगे्रसच्या पािंठब्याने सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न करीत असताना, गडकरी यांनी टाकलेली ही गुगली महत्त्वाची मानली जात आहे.
 
 
 
आपण सामना हरलो आहोत, असे आपल्याला जेव्हा वाटत असते, त्याचवेळी प्रत्यक्षात निकाल वेगळेच येत असतात, असे गडकरी यांनी राज्यातील विद्यमान राजकीय स्थितीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नात सांगितले. गुरुवारी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्यातील राजकीय स्थितीवर सध्याच मी फार काही बोलणार नाही. माझ्या राजकीय कारकीर्दीतील जास्त काळ दिल्लीत गेला असल्याने, राज्यातील राजकीय स्थितीबाबत मला फार जास्त माहिती नाही, असे ते म्हणाले.