वाशिममध्ये परतीच्या पावसाने शेतकर्‍यांचे 197 कोटीचे नुकसान

    दिनांक :16-Nov-2019
वाशीम, 
एनडीआरएफ आणि एसडीआरएफ च्या निकषानुसार नैसर्गिक आपत्तीत 33 टक्यापेक्षा जास्त नुकसानीसाठी शेतकर्‍यांना सरकार तर्फे मदत दिली जाते. या निकर्षाचा आधार घेत केल्या गेलेल्या सर्व्हेनुसार वाशीम जिल्ह्यात 197 कोटी 89 लाख 39 हजार एवढे नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामधील वरिष्ठ सुत्रांनी दिली. 

 
 
 
पश्‍चिम विदर्भाचा विचार केल्यास अमरावती विभागात हाच आकडा एक हजार 543 कोटी 67 लाख 56 हजार रुपये एवढा आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर 2019 या कालावधीत अवेळी पाऊस व अतिवृष्टीमुळे बागायती शेतीचे 3 हजार 522 शेतकर्‍यांचे 3 कोटी 92 लाख 18 हजार 850 रुपयाचे नुकसान झाले आहे. तर 434 शेतकर्‍याचे 602.99 बाधीत क्षेत्राचे 1 कोटी 8 लाख 53 हजार 820 एवढे नुकसान झाले आहे. तर 2 लाख 46 हजार 394 शेतकर्‍याचे 2 लाख 83 हजार 656.94 बाधीत क्षेत्राचे 192 कोटी 88 लाख 67 हजार 192 एवढे नुकसान झाले.
 
 
वाशीम जिल्ह्याचा विचार केल्यास 2 लाख 50 हजार 350 शेतकर्‍याचे 2 लाख 87 हजार 165.03 बाधीत क्षेत्राचे 197 कोटी 89 लाख 39 हजार 862 रुपयाचे नुकसान झाले आहे. पश्‍चिम विदर्भाचा विचार केल्यास 20 लाख 25 हजार 197 शेतकर्‍याचे 22 लाख 44 हजार 398 हेक्टर मधील 1 हजार 543 कोटी 67 लाख 56 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये अमरावती जिल्ह्याचे 254 कोटी 40 लाख 42 हजार, अकोला 255 कोटी 49 लाख 97 हजार, यवतमाळ जिल्ह्याचे 357 कोटी 97 लाख 49 हजार, बुलढाणा 477 कोटी 90 लाख 29 हजार आणि वाशिम जिल्ह्याचे 197 कोटी 89 लाख 39 हजार असे 1543 कोटी 67 लाख 56 हजाराचे नुकसान झाले आहे.
 
 
अमरावती विभागात 1 हजार 543 कोटी 67 लाख 56 हजार रुपयाचे नुकसान झाल्याची आकडेवारी ही सरकारी आकडेवारी आहे. त्यामध्येही 33 टक्केपेक्षा जास्त झालेले नुकसान यामध्ये ग्राह्य धरण्यात आलेले आहे. पण, ज्या शेतकर्‍याचे नुकसान हे 33 टक्केपेक्षा कमी झाले त्याचे काय हा प्रश्‍न अद्याप अनुत्तरित आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ च्या निकषानुसार नैसिर्गक आपत्ती 33 टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना सरकारतर्फे मदत दिली जाते. पण, ज्याचे नुकसान 33 टक्क्यापेक्षा कमी झाले त्याचे काय त्यांना शासकीय मदत मिळेल काय त्याचे सर्वेक्षण जिल्हा प्रशासनाने केले काय हे प्रश्‍न अद्यापही अनुत्तरितच आहे.