शेतकर्‍याच्या गोठ्याला आग लागून लाखांचे नुकसान

    दिनांक :16-Nov-2019
मालेगाव, 
तालुक्यातील झोडगा खुर्द येथील शेतकरी एकनाथ जनार्दन सुरुशे यांच्या शेतातील गट क्र. 49 मध्ये गावालगत जनावरांच्या गोठ्याला आज शनिवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास आग लागल्याने गोठा जळून खाक झाला आहे. या आगीत शेतीपयोगी साहित्यासह इतर वस्तु जळाल्याने त्यांचे जवळपास 2 लाख 37 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. 

 
 
 
एकनाथ सुरुशे यांचा गावालगत गुरांचा गोठा आहे. शनिवारी सकाळी या गोठ्याला अचानक आग लागली. यामध्ये गोठ्यातील सर्व शेतीपयोगी व इतर साहीत्य जळून खाक झाले. याबबातची माहिती पोलिस स्टेशन व महसूल चे तलाठ्यांना दिली. या दोघांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली तसेच तलाठ्यांनी केलेल्य पंचनाम्यात 2 लाखाचे वर नुकसान झाल्याचा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात आला.
 
 
या आगीत शेतीपयोगी अवजारे, 6 ताडपत्री, कॉमेंट इंजिन, 1 हजार फुट केबल, लक्ष्मी कंपनीचा मोटारपंप, स्प्रिंकलर सेट, स्टार्टर, एक ट्रॅक्टर टायर, तिफन, डवरे, वखर व इतर साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे शेतकर्‍यांचे अंदाजे 2 लाख 37 हजार रुपयाचे नुकसान झाले. पंचनामास्थळी रामकिशन वाघ, सरंपच जयश्री कांबळे, भागवतगवई, शेषराव वाघ, संजय सुरुशे, ठाकरे यांच्या सह्या आहेत. शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.