गोव्यात नौदलाचे लढाऊ विमान कोसळले

    दिनांक :16-Nov-2019
पणजी, 
गोव्यात नौदलाचे विमान कोसळण्याची घटना आज दुपारी बाराच्या सुमारास घडली. विमानाला आग लागल्याचे कळताच दोन्ही वैमानिकांनी पॅराशूटचा वापर करत विमानातून बाहेर उडय़ा टाकल्या. त्यामुळे ते बचावले. विमान लगेच वेर्णा औद्योगिक वसाहतीकडील पठारावर कोसळले व खाक झाले. विमानाचे छोटे विखुरलेले तुकडे सापडले आहेत. सविस्तर माहिती यापुढे मिळेल.
 
 
दक्षिण गोव्यातील वेर्णा औद्योगिक वसाहतीजवळ सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. गोव्यातील 'आयएनएस हंसा' हवाई तळावरून विमानाने उड्डाण केले होते. उड्डाणानंतर काही वेळातच एक पक्षानं विमानाला धडक दिली. त्यानंतर विमानाच्या इंजिनानं पेट घेतला. अपघातग्रस्त विमानात दोन पायलट होते. इंजिनाला आग लागल्याचे कळताच दोन्ही पायलट पॅराशूटच्या मदतीनं तात्काळ खाली उतरले. स्थानिकांनी त्यांना मदत केली. लेफ्टनंट कमांडर दीपक यादव आणि कॅप्टन एम. शेवखंड अशी त्यांची नावे आहेत.