ट्रम्प यांच्याकडून नेहमीच दबाव आणण्याचा प्रयत्न

    दिनांक :16-Nov-2019
माजी राजदूत मारी यावानोविच यांची साक्ष
 
वॊशिंग्टन, 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील महाभियोग तक्रारीबाबत सध्या जी जाहीर सुनावणी सुरू आहे, त्यात युक्रेनमधील अमेरिकेच्या माजी राजदूत मारी यावानोविच यांची साक्ष शुक्रवारी झाली. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नेहमीच आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे, असे वाटत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यावर अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष जो बिदेन व त्यांचे पुत्र हंटर बिदेन यांची चौकशी करण्यासाठी दबाव आणला होता, असा आरोप आहे. त्यात वकील रुडी गिलीयानी यांनी ट्रम्प यांना मदत केली होती. बिदेन हे आगामी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवारीचे दावेदार आहेत.
योवानोविच या राजनैतिक अधिकारी होत्या. त्यांना ट्रम्प यांनी मे महिन्यात पदावरून दूर केले होते. युक्रेनच्या अध्यक्षांवर चौकशीसाठी दबाव आणण्याच्या ट्रम्प यांच्या कारस्थानात सहभागी होण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप आहे.