बेलाचे पान, तसे महान!

    दिनांक :16-Nov-2019
|
 
 
 
आपल्या धर्मकर्मांत काही गोष्टींना स्थान देण्यात आले आहे. वृक्ष-वेलींचेही महत्त्व अधोरेखित करणारे सण आहेत आणि त्यांचे विधीही आहेत. विल्वपत्र, तुळस, दुर्वा, विविध वनस्पतींच्या पत्री आणि फुले यांना खास महत्त्व देण्यात आले आहे. त्यात बेलाचे पान महादेवाला प्रिय आहे, असे सांगण्यांत आले आहे. बेलाच्या पानाला का इतके महत्त्व देण्यांत आले आहे? त्याचे औषधी आणि इतर गुणधर्म काय, याकडे थोडा कटाक्ष टाकू-
- बेलाच्या वृक्षा जवळ साप कधीही येत नाही.
- कुणाचीही प्रेत यात्रा बिल्व वृक्षाच्या सावलीतून जात असेल तर त्यास मोक्ष मिळतो, असा समज आहे.
- वायुप्रदुषणाचे दुष्पपरिणाम टाळायचे असतील तर बेलाच्या वृक्षांत तशी क्षमता आहे. वायुमंडळात व्याप्त अशुद्ध घटक निष्प्रभ करण्याची क्षमता सर्वात जास्त बिल्व वृक्षात असते.
- 4, 5, 6, 7 पानांचे बेल पत्र ज्यास प्राप्त होतात तो परम भाग्यशाली असून ते बिल्व पत्र भगवान शिवजीस अर्पण करण्याने अनंत पट पुण्य फल प्राप्त होते.
- बिल्व वृक्षास कापल्याने वंशाचा नाश होतो आणी बिल्व वृक्ष लावण्याने वंश वृद्धी होते, असे सांगून या झाडाची कत्तल होण्यापासून रोखण्यांत आले आहे, कारण माणसाच्या सुदृढ जगण्याशी त्याचा संबंध आहे.
बेल वृक्षा संदर्भात काही धारणा-
- सकाळ- संध्याकाळ बिल्व वृक्षाचे दर्शन घेतल्याने पापांचा नाश होतो.
- बिल्व वृक्षास कायम पाणी दिल्याने पितर तृप्त होतात.
- बिल्वपत्र आणि ताम्र धातुच्या विशेष प्रयोगाने पूर्वी ऋषी- मुनी स्वर्ण धातुचे उत्पादन करत होते.
- जीवनात फक्त एक वेळेस आणि तेही नकळत शिविंलगावर बिल्व पत्र अर्पण केल्यास सर्व पापांतून मुक्ती मिळते.
- बिल्व वृक्ष रोपण, पोषण आणि संवर्धन करण्याने देवाधिदेव महादेव यांचा साक्षात्काराचा अवश्य लाभ होतो.
- बिल्व वृक्षाचे शेतात पाण्याची कमतरता नसते.