आजचे राशी भविष्य: दि. 17 नोव्हेंबर २०१९

    दिनांक :17-Nov-2019
मेष : वाहन काळजीपूर्वक चालवा. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका नाहीतर होत्याचे नव्हते होईल. नवीन कामाचा शुभारंभ करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. आळस आणि थकवा जाणवत असल्याने कामात लक्ष लागणार नाही. आरोग्य यथातथाच राहील.
वृषभ : जोडीदाराचे सहकार्य लाभेल. प्रिय व्यक्तीची साथ लाभेल. आर्थिक गुंतवणूक करणे लाभदायक ठरेल. परिवारातील सदस्यांसोबत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा कराल. कामात समाधान लाभेल. महिलांकडून सन्मान मिळेल. आईशी संबंध चांगले राहतील. 
मिथुन : दिवस चांगला आहे. एखादी शुभवार्ता किंवा रखडलेले पैसे मिळतील. नशीबाची साथ लाभेल, कमी प्रयत्नात अधिक यश मिळेल. मनातील इच्छा पूर्ण होतील. प्रवास चांगला होईल.
कर्क : भागीदारीत काम करताना सावध राहा नाहीतर नुकसान संभवते. आरोग्याची काळजी घ्या. वाद होणार नाहीत याची खबरदारी घ्या. आपले देखील आज परक्यासारखा व्यवहार करतील. दिवसभर संयम पाळा. 
सिंह : कोणतीही प्रतिकूल गोष्ट ऐकल्याबरोबर तणाव जाणवेल. अप्रिय घटना घडतील. विचारपूर्वक प्रवास तसेच कामे करा. साधु-संतांच्या आशीर्वादाने मन प्रसन्न राहील. आज खाण्या-पिण्याची पथ्ये पाळा.
कन्या : मेहनतीनुसार लाभ मिळेल. त्यामुळे आळस करू नका. मिञ आणि नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. व्यापारात लाभ होईल. भटकंतीची योजना आखाल. जोडीदारासोबत संस्मरणीय क्षण अनुभवाल. 
तूळ : एखाद्या ठिकाणी पैसे रखडले असतील तर ते आज मिळतील. प्रयत्नांनीही कामे होतील, त्यामुळे मेहनतीत कसूर करू नका. यश, मान-सन्मानात वाढ होईल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. महत्त्वाची कामे इतरांवर सोपवू नका. परिवारात आनंद नांदेल. 
वृश्चिक : कामाच्या ठिकाणी आज दिवस अनुकूल राहील. सहकारी आणि वरिष्ठांचे आपल्याला पूर्ण सहकार्य लाभेल. घरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण राहील. नवीन संपर्कातून लाभ होईल. महिलावर्गाचे सहकार्य लाभेल. 

धनु : खर्च वाढेल, सावध राहा. कामात अडचणी आल्याने त्रास होईल. धीराने घ्या आणि संकटांना सामोरे जा. इच्छाशक्ती प्रबळ असल्यास प्रगतीचा मार्ग प्रशस्त होईल. जोडीदारामुळे चिंता वाढेल. 
मकर : ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. प्रवास चांगला होईल. प्रगतीच्या वार्ता कळतील. पुरस्कार किंवा भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. परिवारात आनंद आणि उत्साहाचे वातावरण राहील. फिरायला जाण्याचे बेत आखाल. 
कुंभ : प्रिय व्यक्तीची भेट आणि सहकार्य लाभेल. भाऊ-बहिणींशी संबंध चांगले राहतील. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. सुख-सोयींच्या साधनांवर पैसे खर्च होतील. गुप्त शत्रूंचा त्रास होईल. आरोग्याची काळजी घ्या. 
 
 
मीन : नशीब जोरावर असल्याने यश मिळेल. विरोधकांचा पराभव होईल. व्यवहार कुशलतेने आपली कामे होतील. कामाच्या ठिकाणी प्रभाव आणि सन्मान वाढेल. अनेक चांगल्या संधी येतील त्यांचा लाभ घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.