मेंदूची आज्ञावली

    दिनांक :17-Nov-2019
‘मेंदूची आज्ञावली’ म्हणजे मेंदूला दिलेला कार्यक्रम किंवा कृतिक्रम. यानंतर हेच करायचं. गोंधळ नाही. खरंतर, आत्ता याक्षणी, नेमकं काय करायचं, काय बोलायचं, हसायचं की नाही... या गहन गोष्टी वर्ष-दोन वर्षांचे मूलसुद्धा ठरवते. हातातला चेंडू रस्त्यावरच्या अनोळखी माणसाच्या पाठीवर मारायचा का? काय होईल? हे त्याच्या मेंदूला क्षणात कळते; त्याला मोठासा विचार करावा लागत नाही. समोरून स्कूटर जोरात येतेय; आपण बाजूला झालेच पाहिजे- हा विचार दोन वर्षांचे मूल करते व तसा आदेश त्याच्या मेंदूला देते. म्हणजेच, मन, मेंदू व देह यामध्ये न गुरफटलेला मुलांचा आत्मा, सगळं आपोआप निभावून नेतो. त्या मुलाला नकळतपणे आत्मनाश समजतो आणि तो आत्मभान आपोआप जागवतो आणि थंडपणे कार्यक्रम करायला भाग पाडतो. लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्व जगात असे आपोआप चाललेलं आहे, म्हणूनच जगातील व्यवहार सुरळीतपणे होत आहेत. म्हणजेच, ‘सॉफ्टवेअर फॉर दी ब्रेन’ हे माणसाला जन्मजात (उपजत) दिलेले दिसते. वेळोवेळी नॉर्मलवर यायला तेच खुणावते.

 
 
‘मेंदूची हानी कमी कशी होईल?’ हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो. अर्थात तशी जाण आली तर. डीजनरेशन ऑफ ब्रेन से तस’ ही वैद्यकीय भाषा झाली. या सेल्स किंवा पेशी का मरतात? हे अजूनही नक्की माहीत झालेले नाही. पण, सावकाशीने काम केल्यामुळे मेंदूची हानी कमी होते.
हळूहळू, शनैःशनैः, आस्ते-आस्ते, थांबून थांबून, पायरी पायरीने किंवा अगदी गप्पा मारत, हसत-हसत, रमत-रमत कामे केली तर मेंदूला आराम मिळतो, याचा अनुभव तुम्हालाही बर्‍याच वेळी आला असेल. मन दमदार गड्याप्रमाणे, एकाच कामात मग्न असले, गुंग झालेले असले, भान हरपलेले असले की, ते स्वतःबरोबरच रमते आणि मेंदूची हानी कमी होते.
शंभर गोष्टी डोक्यात येऊ लागल्या की सगळा विचका होतो, मेंदूचा चुथडा होतो. एका रेषेत काम करायचे असले, मग ते भले धुणीभांडी करायचे असो किंवा स्वयंपाकपाणी करावयाचे असो किंवा रुटीन ऑफिस वर्क असो, मेंदूची हानी कमी होते. असल्या कामाला ‘ब्रिकवर्क’ किंवा वीटकाम म्हणतात. इथे ब्रेनडॅमेज कमी होते. पण, मल्टिटास्किंग झाले की मेंदू भडकतो. बिथरतो. ‘माइंड इज वन युनिफॉर्म, लाईक अेलेक.’ मन हे एखाद्या लाटा नसणार्‍या अथांग सरोवरासारखे असते. त्यात कुठूनही विचाराचा खडा येऊन पडला की, लगेचच तरंग निर्माण होतात आणि ते मोठेमोठे होत नाहीसे होईपर्यंत, मेंदूची हानी करू शकतात. म्हणून स्वतःच्या किंवा दुसर्‍यांच्या मेंदूत, नको ते विचार आणू देऊ नका. लोकांना समजूतदार म्हणा, म्हणजे त्यांचे मेंदू तब्येतीत राहतील. ‘तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या’ म्हणा. तुमच्यातला ‘स्वानंद’ सुवासासारखा पसरेल. तुमच्या मेंदूची हानी कमी होईल. दुसर्‍याच्या पाठीवर थाप द्यायला शिका, त्याचा सराव करा. कसा आहेस तू? असे मोजकेच, हसून विचारायला काही पैसे मोजावे लागत नाहीत.
र्ींसुरेश परुळेकर
9822313385
श्रश्र