लतादीदींच्या प्रकृतीत सुधारणा

    दिनांक :18-Nov-2019
मागील आठ दिवसांपासून रुग्णालयात असलेल्या लता मंगेशकर यांची प्रकृती सध्या स्थिर त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याची माहिती लताजींच्या कुटुंबीयांनी सांगितली. गेल्या काही दिवसांपासून त्यांना लिक्विड डाएटवर ठेवण्यात आले होते. आज त्यांनी जेवण केले, असेही मंगेशकर कुटुंबीयांच्या सदस्याने सांगितले. ब्रीचकँडी रूग्णालयात लताजींना दाखल करण्यात आले असून याच रुग्णालयातील एका डॉक्टराने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली.
 
 

 
डॉ. फारुख उद्वारिया यांच्या देखरेखीखाली लता मंगेशकर यांच्यावर उपचार केले जात आहेत. मागच्या सोमवारी लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. निमोनिया आणि श्वसनाचा त्रास या दोन कारणांमुळे त्यांना ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. लता मंगेशकर यांची प्रकृती आधीपेक्षा बरीच चांगली आहे असे त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याने सांगितले आहे. तसेच लोकांनी दिलेल्या शुभेच्छांबाबत कुटुंबीयांनी आभारही मानले आहेत.
दोन दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लता मंगेशकर यांची भेट घेतली होती. त्यांनीही ट्विट करुन दीदी लवकर बऱ्या होतील अशी भावना व्यक्त केली.