'या' अभिनेत्रीने केला चक्क ऑटोने प्रवास

    दिनांक :19-Nov-2019
मुंबई,
कोणत्या न कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत राहणारी बॉलिवूडची हॉट अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका वृत्ताने दिलेल्या माहितीनुसार, मलायकाने तिच्या महागड्या गाड्या सोडून चक्क रिक्षाने प्रवास केला आहे. दरम्यान मलायकासोबत तिची आई देखील रिक्षामध्ये असल्याचे दिसत आहे. सध्या मलायकाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
 
 
 
नेहमी हॉट लूकने चाहत्यांची मने जिंकणाऱ्या मलायकाने सामान्य माणसांप्रमाणे रिक्षाने प्रवास करत चाहत्यांच्या मनात घर केले आहे. मलायकाने रिक्षामधून प्रवास करताना पांढऱ्या रंगाचा लांब शर्ट परिधान केला असून त्यावर शोभून दिसतील असे बूट आणि टोपी घातली होती. या लूकमध्ये मलायका अत्यंत सुंदर आणि ग्लॅमरल अंदाजात दिसत होती.
 

 
 मलायकाचा कलाविश्वात पूर्वीसारखा फारसा वावर राहिलेला नाही. मात्र बॉलिवूडमध्ये देखील तिच्या नावाची चर्चा कायम सुरू  असते. काही दिवसांपूर्वी मलायकाने तिचा ४६वा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला होता. तिच्या वाढदिवसाचे फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. आता मालयकाचे ऑटोमधून फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाला आहेत.