रश्मी देसाई करणार ‘बिग बॉस’च्या घरात दुसरं लग्न?

    दिनांक :02-Nov-2019
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रश्मी देसाई ‘बिग बॉस १३’मुळे फार चर्चेत आहे. हे पर्व रश्मीच जिंकेल असा विश्वास तिच्या चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे रश्मीकडूनही प्रसिद्धीसाठी फार प्रयत्न केले जात आहे. ‘बिग बॉस १३’च्या ‘वाईल्ड कार्ड एण्ट्री’मध्ये आता रश्मीचा कथित प्रियकर अरहान खान येणार आहे. रश्मी आणि अरहान बिग बॉसच्या घरात लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे.
 
 
 
२०१७ मध्ये युविका आणि प्रिंस नरुला यांच्या लग्नात रश्मी-अरहानची पहिल्यांदा भेट झाली. त्यानंतर या भेटीचं प्रेमात रुपांतर झालं. मात्र हे दोघंही या विषयावर बोलणं टाळत असून ते एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे सांगत आहेत. रश्मीने नंदीश संधूला घटस्फोट दिला. रश्मी गरजेपेक्षा जास्त संवेदनशील असल्यामुळे ती डोकेदुखी ठरत असल्याचं नंदीशने सांगितलं होतं. त्यामुळेच या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.
बालिका वधू या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली रश्मी सध्या ‘बिग बॉस’मध्ये सर्वांत तगडी स्पर्धक असल्याचे म्हटले जाते . वाईल्ड कार्ड एण्ट्रीमध्ये अरहानसोबतच ‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफालीसुद्धा असणार आहे.
‘बिग बॉस’चा यंदाचा सिझन फारच चर्चेत आहे. या सिझनमधील बदललेल्या काही नियमांवर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला होता. एकाच बेडवर दोन स्पर्धकांना झोपण्याची परवानगी दिल्याने पुरुष स्पर्धकासोबत महिला बेड शेअर करत असल्याचं या सिझनमध्ये पाहायला मिळालं. त्यामुळे अनेकांनी या कार्यक्रमावर आक्षेप घेत त्यावर बंदीची मागणी केली होती.