मृणाल कुलकर्णी परीक्षकाच्या भूमिकेत

    दिनांक :20-Nov-2019
आपल्या संवेदनशील अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आता एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही भूमिका कोणत्याही टीव्ही मालिकेमधली किंवा सिनेमामधली नाही. ही भूमिका एका परीक्षकाची आहे. संगीतविषयक एका आगामी रिअॅलिटी शोमध्ये राहुल देशपांडे आणि आदर्श शिंदे यांच्यासोबत मृणाल कुलकर्णी परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. या नव्या शोबद्दल प्रेक्षकांनाही उत्सुकता असेल.