भल्लालदेवच्या वडिलांच्या घरावर छापे

    दिनांक :21-Nov-2019
नवी दिल्ली,
बाहुबली चित्रपटातील भल्लालदेवची भूमिका साकारणार्‍या राणा दग्गुबातीचे वडील सुरेश बाबू यांच्या घर आणि स्टुडिओसह अन्य ठिकाणांवर आयकर विभागाने छापे मारले आहेत.
 
 
 
दग्गुबाती सुरेश बाबू यांचा हैदराबादमध्ये रामानायडू नावाचा स्टुडिओ आहे. ते टॉलिवूडचे मोठे निर्माते म्हणून ओळखले जातात. आयकर विभागाने हैदराबादच्या त्यांच्या निवासस्थानीही छापा मारल्याचे समोर आले आहे. रात्री उशिरापर्यंत आयकर विभागाकडून झाडाझडती सुरू होती. आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी महत्वाची कागदपत्रेही तपासली. यातील काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. निर्माते दग्गुबाती सुरेश बाबू यांच्याकडून अद्याप काही माहिती मिळालेली नाही.
 
सुरेश बाबू यांनी चित्रपट निर्मिती केंद्राची सुरुवात केली होती. त्यांनी आतापर्यंत 150 सिनेमांची निर्मिती केली आहे. या निर्मिती केंद्राचे आंध्रप्रदेश आणि तेलंगणात काही थिएटरही आहेत. आयकर विभागाचा छापा पडला तेव्हा सुरेश बाबू देशात नसल्याचे समजते. आयकर विभागाच्या रडारवर अन्य निर्मात्यांचे चित्रपट निर्मिती केंदेही आहेत. यामध्ये नॅचरल स्टार नानी, हरिका हसाईन क्रिएशन्स, सितारा एंटरटेन्मेंट यांची नावे आहेत.