मासिकपाळी दरम्यानची काळजी

    दिनांक :22-Nov-2019
मासिकपाळीबाबत अनेक समज आणि गैरसमज आढळून येतात. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने मासिक पाळी नियमित असणं महत्त्वाचं असतं. पण आजच्या धकाधकीच्या जीवनात महिला मासिक पाळीदरम्यान आरोग्याची पुरेशी काळजी घेत नाहीत. आरोग्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणूनच या चुका टाळायला हव्या. 
 
  • मासिक पाळीदरम्यान शरीर अशक्त होतं. पण याकडे दुर्लक्ष करुन महिला या दिवसातही बरीच धावपळ आणि मेहनतीचं काम करतात. यामुळे पाठदुखीची समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणूनच या दिवसात शक्य तितका आराम करायला हवा.
  • मासिक पाळीदरम्यान उपवास केल्यामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. या दिवसात शरीराला पोषक घटकांची सर्वाधिक गरज असते. म्हणूनच उपवास टाळावा.
  • मासिक पाळीदरम्यान जागरण करू नये. सात ते आठ तासांची झोप घ्यावी. पुरेशी झोप मिळाली नाही तर डोकेदुखी, अंगदुखीसारख्या समस्या निर्माण होतात. या काळात शारीरिक स्वच्छता राखावी. दर तीन ते चार तासांनी सॅनिटरी पॅड्‌स बदलायला हवेत. योग्य स्वच्छतेअभावी जंतूसंसर्ग होण्याची शक्यता वाढते.