'ही' अभिनेत्री 'तारक मेहता'मधून बाहेर

    दिनांक :22-Nov-2019
|
मुंबई,
गेल्या दशकभरापासून प्रत्येक घरात पाहिली जाणारी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका लोकांचे मनोरंजन करीत आहे. छोट्या मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींच्या पसंतीमुळे ही मालिका टीआरपीच्या यादीतही अव्वल क्रमांकावर आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून मालिकेतील कलाकार काही कारणास्तव बाहेर पडत आहेत. सर्वप्रथम टप्पूची भूमिका साकारणाऱ्या भव्य गांधीने हा कार्यक्रम सोडला. त्यानंतर नीधी भानुशाली या मालिकेतून बाहेर पडली. 'दयाबेन' ची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी आता मालिकेत दिसत नाही. यातच, आता पुन्हा एकदा या मालिकेला एक झटका बसला आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत बावरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका भदोरिया या मालिकेतून बाहेर पडली आहे.
 

 
 
कमी मानधन मिळत असल्याने मोनिकाने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. मानधन वाढवून देण्याची मागणी तिने मालिका निर्मात्यांकडे केली होती. परंतु, तिची मागणी मान्य न झाल्याने तिने अखेर या मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या वृत्ताला तिने स्वतःच दुजोरा दिला आहे. शोच्या प्रवासाबद्दल सांगताना मोनिका म्हणाली की, या मालिकेतील शो आणि पात्र निश्चितपणे माझ्या खूप जवळचे आहेत. मला चांगले मानधन मिळावे अशी माझी मागणी होती. परंतु, ती पूर्ण न झाल्याने मी या मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. जर मला माझे मानधन वाढवून मिळत असेल तर मला पुन्हा या मालिकेत काम करायला आवडेल, असेही ती म्हणाली.