पत्नी; एक महान कलाकार

    दिनांक :23-Nov-2019
|
मुलीचं लग्न झालं की तिचं रूपांतर ‘पत्नी’मध्ये होतं. लग्नानंतर काही महिने ती नवर्‍याची प्रेयसी असते. मघुचंद्र व त्यानंतरचा काही काळ हा तिच्या जीवनातला अत्यंत बहारीचा काळ असतो. त्या वेळी तर ती जणूकाही हवेतच तरंगत असते. पण, त्यानंतर वास्तवाला सामोरं जावंच लागतं. हवेतून तरंगत ती शेवटी जमिनीवर येते व गृहिणीच्या भूमिकेत शिरते. एकदा गृहिणी झाली की, कुटुंबाच्या देखभालीची जबाबदारी तिच्यावर येऊन पडते. त्या दरम्यान तिला अनेक लहान-मोठ्या भूमिका कराव्या लागतात. उदा. घरात कुणी आजारी असेल, तर त्याची शुश्रूषा करताना तिला नर्सची भूमिका करावी लागते. घरातील घरखर्चाचे बजेट बनवून घरखर्च मिळकतीच्या वर जाणार नाही हे पाहताना ती एका अकाऊंटंची भूमिका पार पाडीत असते. घरातील निरनिराळ्या उपकरणांची-फ्रिज, वॉिंशग मशीन, मिक्सर इ.ची देखभाल करताना ती एका टेक्निशियनची भूमिका करते. घरात काही मोठे कार्य असेल, तर त्याची पूर्ण तयारी (निमंत्रणापासून ते केटरर ठरविणे, मेन्यू ठरविणे) या सगळ्या व्यवस्था करताना ती एका इव्हेंट मॅनेजरची भूमिका पार पाडते. घरात पाहुणे आल्यानंतर त्यांचा व्यवस्थित रीतीने पाहुणचार करताना ती एका हॉस्पिटॅलिटी स्पेशॅलिस्टची भूमिका करते. याशिवाय, दोन दिवस मोलकरीण आली नाही, तर तिला समुपदेशकाची भूमिका वठवावी लागते. पत्नी झाल्यामुळे तिला काही नवीन नात्यांना सामोरं जावं लागतं. उदा. पत्नी झाल्याबरोबर कुणाची तरी सून होते, वहिनी होते, काकू होते, मामी होते, जाऊ होते. या नवीन भूमिकाही तिला कराव्या लागतात.
 
 
 
याव्यतिरिक्त तिला एक अत्यंत अवघड भूमिका पार पाडावी लागते आणि ती म्हणजे नवरा नामक प्राण्याचा आयुष्यभर सांभाळ करणे. नवरे तरी किती प्रकारचे असतात...! काही विक्षिप्त, रागीट, कुरूप, अपंग तर काही व्यसनी, व्याधिग्रस्त, संशयी, क्रूर... आणखी कितीतरी प्रकार सांगता येतील. अर्थात, याला अपवाद असतातच. यातील कोणता नवरा तिच्या नशिबी येईल, हे तिच्या पारब्धावर अवलंबून असतं, जे कुणीही बदलू शकत नाही. त्यामुळे ‘पदरी पडलं आणि पवित्र झालं’ या न्यायाने ती हे नवरासंगोपनाचं कार्य चालू ठेवते आणि तेही आयुष्यभर. ही भूमिकापण ती समर्थपणे पेलते. ‘नटसम्राट’ या नाटकात पत्नीचं वर्णन थोडक्यात असं-
पत्नी मैत्रिणीपेक्षा आई अधिक असते. दिवाणखाना कमी असते, पण देऊळ जास्त असते. आकाश कमी असते, पण पृथ्वी अधिक असते. थोडक्यात, पत्नी हे एक बंदर असतं, नवरा नावाच्या गलबतासाठी. गलबताच्या पराक्रमाचा उदय बंदरात होतो. पराजयाचे सांत्वनही त्याला बंदरातच मिळते. अशी आहे बंदराची म्हणजेच पत्नीची महती.
पत्नी आध्यात्मिक भूमिकाही करते. ती आपल्या आयुष्यात कर्मयोग, भक्तियोग व ज्ञानयोग याचा विवेकपूर्ण समन्वय साधते. उदा. ती रोज घरात स्वयंपाकपाणी करते. स्वयंपाकातील पदार्थ (म्हणजे भाजी, आमटी, पोळ्या, कोिंशबीर इ.) बनविणे, हा झाला तिचा कर्मयोग
परंतु, जेवणात बनविलेले सर्व पदार्थ तिचा पती, तिची मुले जेवणार आहेत, तिच्याकडे येणारे पाहुणे जेवणार आहेत, या भावनेने भक्तिभावाने प्रत्येक पदार्थ बनविताना तिखट, मीठ, मसाला प्रमाणशीर वापरून प्रत्येक पदार्थ चविष्ट बनविते. या सर्व गोष्टी करताना तिची जी मनोभावना असते, तो तिचा भक्तियोग.
पण, हे पुरेसं नसतं. तिला प्रत्येक पदार्थ कसा चांगला बनवावा याचं ज्ञानही असावं लागतं. उदा. कणीक भिजवताना पाणी किती घालणे, नंतर पोळ्या गोल कशा लाटणे, आमटी, भाजी इत्यादीत तिखट, मीठ, मसाला किती प्रमाणात घालणे, डाळ किती शिजली म्हणजे चांगली शिजली असे समजणे, इ. सर्व गोष्टींचे ज्ञान असणे. हा झाला तिचा ज्ञानयोग. अशाप्रकारे ती कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग यांचा चांगला समन्वय साधून आपल्या स्वयंपाकाचं कर्म, फलाची अपेक्षा न ठेवता यशस्वी रीत्या पार पाडते.
पुढेजाऊन, हीच पत्नी जेव्हा आई होते तेव्हा तिचं आयुष्यच बदलून जातं. या आईच्या भूमिकेत आपल्या छोट्याला जास्तीत जास्त प्रेम, माया कशी देता येईल याचाच ती विचार करीत असते. त्याचं पालनपोषण करून त्याला व्यवस्थित शिक्षण देऊन त्याला मोठा करते. पण, याहून महत्त्वाचे म्हणजे त्याच्यावर चांगले संस्कार करून त्याला एक चांगला माणूस बनविते. या आईच्या भूमिकेला किती विविध कंगोरे असतात, त्याचं सुंदर वर्णन एका कवीने केले आहे-
‘आई खरंच काय असते
लेकराची माय असते
वासराची गाय असते
दुधाची साय असते
लंगड्याचा पाय असते
धरणीची ठाय असते ।’
पू. सानेगुरुजींनी तर या आईच्या भूमिकेला सर्वोच्च पदावर नेऊन ठेवलं आहे. ते म्हणतात-
‘‘आई शब्दात श्रुती-स्मृती आहेत. सारी महाकाव्यं आहेत. या दोन अक्षरांत माधुर्याचा सागर आहे. फुलांची कोमलता आहे आणि गंगेची निर्मलता आहे. चंद्राची शीतलता आहे आणि सागराची अनंतता आहे. पृथ्वीची ममता आहे. आई हे देवतांचे दैवत आहे.’’ एका इंग्रजी लखकाने म्हटले आहे-
‘ऋृेव लरपपेीं लश र्शींशीूुहशीश, डे हश ारवश ोींहशीी.’
‘पत्नी’ने वरील अनेक भूमिका पार पाडल्यानंतर, काही वर्षांनंतर तिच्याकडे येते सासूची भूमिका. ही भूमिका प्रेमळ सासूची असू शकते किंवा खलनायकी खाष्ट सासूची असू शकते. ती कोणत्या प्रकारची भूमिका करेल, हे तिच्या स्वभावावर अवलंबून असते.
काही वर्षांपूर्वी एका सिनेनटाने एकाच सिनेमात नऊ वेगवेगळ्या भूमिका केल्या होत्या, तेव्हा त्याचं किती कौतुक झालं. आपल्याच घरातील महान कलाकाराने तर एकाच आयुष्यात कितीतरी निरनिराळ्या भूमिका केल्या असतात. मग तिचं तोंडभरून कौतुक व्हायला नको?
व्हायलाच पाहिजे, हो ना?
म्हणूनच छे ङळषश थळींर्हेीीं थळषश!
शं. ना. देशपांडे
9423687554